सैनिक_ स्कूल _सातारा_(६वी व ९वी)



सातारा सैनिक शाळा प्रवेश प्रक्रिया २०१८-१९*




    प्रवेश क्षमता (Admission Seats Availability):
  •   ६वी प्रवेशासाठी (For Admission in 6th Std) : 71 जागा (Seats)
  •   ९वी प्रवेशासाठी (For Admission in 9th Std) : 05 जागा (Seats)

 

  सैनिक स्कूल, सातारा येथे इयत्ता ६ वी व ९ वी साठी वर्ष 2018- 2019 सत्राच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत (मुलींना या शाळेत प्रवेश दिला जात नाही), असे प्राचार्य, सैनिक स्कूल, सातारा यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                  प्राचार्यांनी म्हटले आहे, प्रवेश परीक्षा ओएमआर पध्दतीने घेतली जाईल. ज्यात उत्तरे बहुपर्यायी असतील. वयोमर्यादा व निवड पध्दती अशी : सहावी- उमेदवाराची जन्मतारीख ही 2 जुलै 2007 ते 1 जुलै 2008 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान असावी, लेखी परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय तपासणी अशी निवड पध्दत राहील, रिक्त जागा- 71. नववी- उमेदवाराची जन्मतारीख 2 जुलै 2004 ते 1 जुलै 2005 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान असावी व उमेदवार हा प्रवेशावेळी मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता आठवी उत्तीर्ण झालेला असावा, लेखी परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय तपासणी अशी निवड पध्दत राहील, रिक्त जागा- 05 (रिक्त जागांच्या संख्येत वाढ/कमी होवू शकते).राखीव जागा- अनुसूचित जाती- 15 टक्के, अनुसूचित जमाती- 7.5 टक्के, आजी व माजी सैनिकांची मुले- 25 टक्के (अ. जा. व अ. ज. यांच्या राखीव जागा सोडून). प्रवेश परीक्षा केंद्रांची नावे अशी- सहावी- अहमदनगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, पुणे, सातारा. नववी- फक्त सातारा.
प्रवेश परीक्षा रविवार 7 जानेवारी 2018 रोजी होईल. परीक्षेबाबतचे माहिती पत्रक शाळेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.प्रवेश परीक्षा अर्ज 16 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत शाळेच्या संकेतस्थळावर आणि सैनिक स्कूल, सातारा येथे कार्यालयीन दिवसांमध्ये सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. प्रवेश परीक्षा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2017 सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा स्वत: शाळेच्या कार्यालयात जमा करू शकतात. कुरीअर अथवा पोस्टाने उशिरा येणारे अर्ज रद्द केले जातील व त्यास शाळा प्रशासन जबाबदार राहणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.

 
प्रवेश परीक्षा अर्ज दरपत्रक
उमेदवाराची श्रेणी, ऑनलाइन प्रवेश परीक्षा अर्ज (रक्कम फक्त डिमांड ड्राफ्टनेच स्वीकारली जाईल), ऑफलाइन प्रवेश परीक्षा अर्ज (रक्कम डिमांड ड्राफ्टने किंवा रोखीने स्वीकारली जाईल.) या क्रमाने : सामान्य प्रवर्गातील मुले (जनरल), संरक्षण दलातील आजी/माजी कर्मचाऱ्यांची मुले, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्गातील मुले, रु. 400/-, रु. 400/-, फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वर्गातील मुले- रु. 250/-, रु. 250/-. डिमांड ड्राफ्ट हा प्रिन्सिपल, सैनिक स्कूल सातारा यांचे नावाने काढलेला असावा (मनी ऑर्डर, पोस्टल ऑर्डर, चेक, चुकीचे डिमांड ड्राफ्ट स्वीकारले जाणार नाहीत.


अर्ज करण्याची पध्दत :
प्रवेश परीक्षा अर्ज शाळेच्या कार्यालयात सर्व कार्यालयीन दिवसांमध्ये सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत रोखीने अथवा डिमांड ड्राफ्टने उपलब्ध असतील. 2) प्रवेश परीक्षा अर्ज हे पुढील गोष्टींच्या पूर्ततेवर फक्त पोस्टाने पाठविले जातील. 1) लेखी विनंती अर्ज, 2) स्वत:चा पत्ता लिहिलेले व रु. 40/- चे पोस्टल स्टॅम्प लावलेले 10 बाय 12 इंच आकाराचे क्लॉथबाऊंड पाकिट, आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्रॉफ्ट. चुकीचा पत्ता किंवा पोस्ट दिरंगाई या कारणास्तव प्रवेश परीक्षा अर्ज मिळाला नाही, तर त्यास शाळा प्रशासन जबाबदार राहणार नाही. ऑनलाइन प्रवेश परीक्षा अर्ज शाळेच्या वेबसाइटवर 16 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत उपलब्ध असेल. पूर्ण केलेल्या अर्जासोबत आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट जोडणे अनिवार्य आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 30th November 2017
अर्ज कसा करावा : How to Apply
ऑनलाइन अर्ज करा : Apply Online
जोडपत्रे :
सर्व उमेदवारांसाठी- मुलाचा फोटो साक्षांकित केलेले, सही व शिक्का असलेले बोनाफाइड सर्टिफिकेट (मुलगा सध्या ज्या शाळेत शिकत आहे त्यांचेकडून), अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वर्गातील उमेदवारांसाठी उमेदवाराचा प्रमाणित केलेला जातीचा दाखला, आजी सैनिकांच्या मुलांसाठी- सध्या कार्यरत असलेल्या सैनिकांचे सर्व्हिंग सर्टिफिकेट आणि मुलाच्या जन्मतारखेची नोंद असलेली पार्ट टू ऑर्डरची प्रमाणित प्रत. माजी सैनिकांच्या मुलांसाठी माजी सैनिकांच्या डिस्चार्ज सर्टिफिकेटची प्रमाणित प्रत. पूर्ण भरलेला प्रवेश परीक्षा अर्ज हा प्रिन्सिपल, सैनिक स्कूल सातारा यांचेकडे 5 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचला पाहिजे. दिलेल्या मुदतीनंतर उशिरा पोहोचलेले अर्ज हे नाकारले जातील. तसेच अर्जाच्या रकमेची परतफेड होणार नाही. अधिक माहितीसाठी शाळेच्या 02162- 235860, 238122 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा शाळेच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Source - Dailyhunt
ऑनलाइन  हेल्प आणि स्टडी मटेरियल साठी आपण खाली कमेन्ट करा ...

Swapnil Kankute

1 Comments

  1. आपल्या मित्र परिवारा मध्ये कुणी सैनिकी भरतीसाठी तयारी करत असेल तर , त्याच्या साठी सुहार्ण संधि आहे. वर्ग ६वी आणि ९वी शिकत असलेल्या आपल्या परिवारा किवा मित्रानं मध्ये जर कुणी साठी उपयुक्त आहे असे वाटत असेल तर त्यांना शेअर करा

    ReplyDelete
Previous Post Next Post