हेलो मित्रानो आज आपन सरकारी योजने बद्दल माहिती घेणार आहे. या महितीच उपयोग स्पर्धा परिक्षाच्या अभ्यासासाठी तसेच सामान्य माहिती म्हणून आपन वाचन करू शकता.
2 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला.
या योजनेचा मुख्य उद्देश 201 9 मध्ये महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त स्वच्छ आणि सुंदर भारताचे स्वप्न पूर्ण करणे हे आहे.
योजनेचा नारा आहेः एक कदम स्वछता की ओर. स्वच्छ भारत अभियान, शहरी विकास मंत्रालय (एमओयूडी) आणि शहरी व ग्रामीण भागात अनुक्रमे पेयजल आणि स्वच्छता ,मंत्रालय (एमडीओ डीडब्लूएस) द्वारे राबविण्यात येत आहे.
2016 मध्ये स्वच्छ भारत सर्वेक्षणाची यादीत सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम आला. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत देशातील 100 आयकॉनिक वारसा, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थळांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या शहरांना व जिल्ह्यांना विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निर्मल भारत अभियानाचं नाव बदलून स्वच्छ भारत अभियानाचं नाव देण्यात आलं आहे.
अधिकृत संकेतस्थळ: http://swachhbharat.mygov.in
0 Comments