पोलीस उपनिरीक्षक - Sub-Inspector स्पर्धा माहिती व मार्गदर्शन

पोलीस उप निरीक्षक पदाविषयी थोडक्यात काही महत्वपूर्ण माहिती मी आपल्या पर्यन्त घेऊन येत आहे . आशा करतो आपणास संपूर्ण माहिती मोलाची उपयुक्त ठरेल. 

पोलीस उपनिरीक्षक या पदाची परीक्षा  एमपीएससी मार्फत घेण्यात येते. एमपीएससी बद्दल थोडक्यात जाणून घेऊया . 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगा विषयी थोडक्यात,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय संविधानाच्या कलम ३१५ नुसार करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करणारा आयोग आहे. 

पोलीस सब इन्स्पेक्टर (Police Sub Inspector)राज्य शासनाच्या सेवेतील पोलीस उप निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) पद असून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावत आहे.
पद : गट – ब (अराजपत्रित)
नियुक्तीचे ठिकाण : राज्य शासनाच्या पोलीस दलाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात.
वेतन व ग्रेडवेतन : रुपये ९३०० – ३४८०० – ३४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
उच्च पदावरील बढतीची संधी : ज्येष्ठता व पात्रतेनुसार सहायक पोलीस निरीक्षक व त्यावरील पदे.
महाराष्ट्र लोकसेवाआयोगामार्फत घेण्यात येण्याऱ्या पोलीस उप निरीक्षक निवडीसाठी घेण्यात येण्याऱ्या परीक्षेचा तपशील,
महाराष्ट्र लोक सेवा आयोग, पोलीस सब-इन्स्पेक्टर (PSI) परीक्षा एकूण चार टप्प्यात घेण्यात येते :-
(1) पूर्व परीक्षा – 100 गुण .
(2) मुख्य परीक्षा – 200 गुण .
(3) शारीिरक चाचणी – 100 गुण .
(4) मुलाखत – 40 गुण .
पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची विहित मर्यादा सिमीत करण्यासाठी घेण्यात येते. या करीता पूर्व परीक्षेसाठी
आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांस मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येते .
पात्रता (अर्हता)
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहीत केलेली समतुल्य अर्हता.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • पदवीच्या शेवटच्या वर्षाला परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
  • वय : किमान वय 19 वर्ष, कमाल वय 33 वर्षे. कमाल वय,ओबीसी उमेदवार (कमाल 35 वर्ष ) आणि अनुसूचित जाती / जमाती / भ.ज. उमेदवार (कमाल 38 वर्ष )
शारीरिक अहर्ता :-पुरुष उमेदवारांकरिता                                               महिला उमेदवारांकरिता
उंची – 165 से. मी. (अनिवार्य) (कमीत कमी)            उंची – 157 से.मी. (अनिवार्य ) (कमीत कमी)
छाती – न फुगिवता 79 से.मी.                                फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक
पूर्व परीक्षा :-परीक्षेचे स्वरूप :- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ( एमसीक्यू )

प्रश्नपत्रिका तपशील खालीलप्रमाणे :-
विषय व संकेतांक – सामान्य क्षमता चाचणी ०१२
एकूण प्रश्न – १०० एकूण गुण – १००
दर्जा – पदवी
परीक्षेचे माध्यम – मराठी व इंग्रजी
परीक्षेचा कालावधी – एक तास
पूर्व परीक्षा अभ्यासक्रम :-१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास ,राज्य व्यवस्थापन व ग्राम व्यवस्थापन
३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
४. भूगोल -पृथ्वी ,जागतिक विभाग ,हवामान ,जमिनीचे प्रकार ,पर्जन्यमान ,प्रमुख पिके ,शहरे ,नद्या ,उद्योगधंदे इत्यादी . 
५. अर्थव्यवस्था
a) भारतीय अर्थव्यवस्था-राष्ट्रीय उत्पन्न,शेती ,उद्योग ,परकीय व्यापार ,बँकिंग ,लोकसंख्या ,दारिद्र्य व बेरोजगारी इत्यादी .
b) शासकीय अर्थव्यवस्था-अर्थसंकल्प लेखा ,लेखापरीक्षण इत्यादी .
६. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र ,प्राणीशास्त्र ,वनस्पतीशास्त्र ,आरोग्यशास्त्र
७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
पूर्व परीक्षा निकाल :-वस्तुनिष्ठ स्वरूपांच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करतांना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चार चुकीच्या उत्तरांमागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
भरावयाच्या एकूण पदांच्या सुमारे ८ पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील. अशारितीने प्रथम टप्यात गुणांची सीमारेषा (cut off line) निश्चित करण्यात येईल. तद्नंतर, दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक प्रवर्गासाठी पदांसाठी १० पट उमेदवार उपलब्ध होतील. अशारितीने सीमारेषा खाली ओढली जाईल. तथापि अशा पद्धतीने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेले अतिरिक्त उमेदवार केवळ त्यांच्या राखीव प्रवार्गासाठीच्या पदावरच निवडीसाठी पात्र असतील.
केवळ सर्वसाधारण (अमागास) उमेदवारांच्या सीमारेषेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची उमेदवारी अंतिम निवडीच्या वेळी सर्वसाधारण (अमागास) पदासाठी विचारात घेतली जाईल. सर्वसाधारण (अमागास) उमेदवारांसाठी असलेली सीमारेषा शिथिल करून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेले उमेदवार अंतिम शिफारशीच्या वेळी फक्त संबंधित आरक्षित पदासाठी पात्र ठरतील.
पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षाच्या प्रवेशासाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने घेण्यात येणारी चाळणी परीक्षा असल्याने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांच्या उत्तर पत्रिकांची फेरतपासणी केली जात नाही अथवा यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या अभिवेद्नावर कार्यवाही केली जात नाही.

मुख्य परीक्षा :-
मुख्य परीक्षेस प्रवेश :-
पूर्व परीक्षेकरिता विहित केलेल्या मर्यादेनुसार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या आणि आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अटींची पूर्तता करणा-या उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.
प्रस्तुत पदाच्या पूर्व परीक्षेसाठी अर्ज करतेवेळी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता नसल्यास व शैक्षणिक अर्हता मुख्य परीक्षेकरिता आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त केल्यास अशा उमेदवाराला शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्याचा दिनांक नमूद करता येईल. कोणत्याही दाव्यामध्ये बदल करता येणार नाही.
मुख्य परीक्षेचे स्वरूप :-प्रश्नपत्रिकेचे स्वरूप :- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऐकूण गुण :- २००
प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे :-
पेपर क्रमांक -१विषय –        मराठी व इंग्रजी विषय
गुण            60 (मराठी) व 40 (इंग्रजी)
प्रश्नसंख्या  60 (मराठी) व 40 (इंग्रजी)
दर्जा           बारावी मराठी व पदवी इंग्रजी दर्जा
माध्यम      मराठी व इंग्रजी माध्यम
कालावधी   एक तास कालावधी
पेपर क्रमांक – विषय –         सामान्यज्ञान ,बुद्धिमापन व विषयांचे ज्ञान
गुण –            100
प्रश्नसंख्या –  100
दर्जा –           पदवी
माध्यम –      मराठी व इंग्रजी
कालावधी –   एक तास
मुख्य परीक्षा अभ्यासक्रम :-
पेपर क्रमांक १(मराठी व इंग्रजी )
मराठी :-
सर्वसामान्य शब्दसंग्रह ,वाक्यरचना ,म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
इंग्रजी: –Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
पेपर क्रमांक – 2 (सामान्यज्ञान, बुद्धिमापन व विषयांचे ज्ञान)१. चालू घडामोडी -जागतिक तसेच भारतातील
२. बुध्दिमत्ता चाचणी
३. महाराष्ट्राचा भूगोल
महाराष्ट्राच्या रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.
४. महाराष्ट्राचा इतिहास
सामाजिक व आर्थिक जागृती, (१८८५ – १९४७), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.
५. भारतीय राज्यघटना
घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलम / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.
६. माहिती अधिकार नियम -२००५
७. संगणक व माहिती तंत्रज्ञान
आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर ,डाटा कम्युनिकेशन, नेट्वर्किंग आणि वेब तंत्रज्ञान, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबधातील कायदे व केस स्टडीज (case law) नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडिया लेब (lab) आशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र, इत्यादी.
८. मानवी हक्क व जबाबदाऱ्या
संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंबलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षण, गुन्हेगारी, इत्यादी) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिशणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
९. मुंबई पोलिस कायदा
१०. भारतीय दंड संहिता
११. फौजदारी प्रक्रिया संहिता -१९७३
१२. भारतीय पुरावा कायदा (INDIA EVIDENCE ACT)
मुख्य परीक्षेचा निकाल,वस्तुनिष्ठ स्वरूपांच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करतांना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चार चुकीच्या उत्तरांमागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
भरावयाच्या एकूण पदांच्या सुमारे ४ पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील. अशारितीने प्रथम टप्यात गुणांची सीमारेषा (cut off line) निश्चित करण्यात येईल.सदर सीमारेषा सर्व उमेदवारांसाठी एकच किंवा प्रत्येक सामाजिक प्रवर्ग / उपप्रवार्गासाठी तसेच महिलां, खेळाडू इत्यादींसाठी वेगवेगळी असेल.
प्रस्तुत लेखी परीक्षेमधून शारीरिक चाचणीसाठी पात्र होण्यासाठी शतमत (Percentile) पद्धत लागू आहे.
शतमत (Percentile) पद्धतीचे निकष
१. अमागास – किमान ३५ % गुण
२. मागासवर्गीय – किमान ३० % गुण
३. अत्त्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू – किमान २० % गुण
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र असलेल्या विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग या प्रवर्गातील उमेदवार तसेच अपंग, महिला व पात्र खेळाडू उमेदवार लेखी परीक्षेत केवळ त्यांच्यासाठी विहित केलेल्या निम्न सीमारेषेनुसार अर्हताप्राप्त झाल्यास अंतिम शिफारशींच्या वेळी त्यांची उमेदवारी केवळ त्या त्या संबंधित प्रवर्गासाठी विचारात घेतली जाईल. निम्न सीमारेषेनुसार अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची सर्वसाधारण (अमागास) पदासाठी विचारात घेतली जाणार नाही.
शारीरीक चाचणीचा तपशील :-
उंची व छातीविषयक विहित मोजमापाच्या  अटी पूर्ण  करणा-या उमेदवारांचीच शारीिरक चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र  असेल.
पुरुषांसाठी (1) गोळाफेक-वजन-7.260 कि. ग्रॅ – किमाल गुण – 15
(2) पुलअप्स – कमाल गुण – 20
(3) लांब उडी – कमाल गुण – 15
(4) धावणे (800 मीटर्स ) – कमाल गुण – 50
महिलांसाठी(1) गोळाफेक-वजन-4 कि. ग्रॅ.- किमाल गुण – 20
(2) धावणे( 200 मीटर्स ) – कमाल गुण -40
(3) चालणे(3 कि .मी.) – कमाल गुण – 40
शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची मुलाखत आयोगाने निर्धारित केलेल्या दिनांकास व ठिकाणी घेण्यात येईल.
 मुलाखत :-
शारीरिक चाचणीच्या  निकालाच्या  आधारे मुलाखतीसाठी पात्र  ठरलेल्या  उमेदवारांनाच मुलाखतीसाठी  बोलाविण्यात  येईल. मुलाखत  40 गुणांची असेल.
मुलाखतीसाठी पात्र  ठरलेल्या  उमेदवारांची पात्रता  जाहिरात/अधिसुचनेतील   अहर्ता/अटी व शर्तिनुसार मुळ  कागदपत्रांच्या आधारे तपासली जाईल आणि  अर्जातील दाव्यानुसार मुळ  कागदपत्रे  सादर करणा-या उमेदवारांची मुलाखत  घेतली जाईल.
विहित कागदपत्रे सादर करु न शकणा-या उमेदवारांची उमेदवारी रद्द  करण्यात  येईल व त्याची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच त्याकरिता  कोणतीही मुदतवाढ  देण्यात येणार नाही.
अंतिम निकाल :-
मुख्य परीक्षा , शारिरीक चाचणी आणि मुलाखतीच्या  प्राप्त  केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करुन गुंवात्ताक्रमानुसार  यादी तयार करण्यात  येईल. सदर गुणवत्ता  यादीमध्ये  समान गुण धारण करणारऱ्या  उमेदवारांचा प्राधान्यक्रम (Ranking) ` उमेदवारांना  सर्वसाधारण सुचना ` मध्ये नमुद केलेल्या  निकषानुसार  ठरिवण्यात  येईल.

एमपीएससी’मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना सामोरे जाव्या लागणाऱ्या शारीरिक चाचणीची आणि नंतर मुलाखतीची तयारी कशी करावी

( वरील लेख एमपीएससी च्या अभ्यासक्रम , विशेष मार्गदर्शक तसेच विविध प्रकारच्या वर्तमान पत्रातून घेतले आहे. तसेच अभ्यास कसा करावे ? शारीरिक चाचण्याची आणि मुलाखतीची तयारी?.....)

या ब्लॉग च्या माध्यमातून विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षाच्या सूचना , माहिती आपल्या पर्यन्त आण्याचा हा उपक्रम कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट / ईमेल च्या माध्यमातून कळवू शकता - स्वप्निल सर )   

Post a Comment

0 Comments

Close Menu