CBSE CTET परीक्षा 8 Dec. 2019 रोजी होणार असून यंदा ही परीक्षा 20 भारतीय भाषांत होणार असल्याची घोषणा सीबीएसई कडून करण्यात आली आहे.


            केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने  डिसेंबरमध्ये होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ची तारीख जाहीर केली आहे.या परिक्षेसाठी अर्ज करण्याचा महत्वाच्या दिनांक, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप व त्यासाठी अभ्यासावयाची महत्वाची पुस्तके यांची माहिती आपणास पुढीलप्रमाणे जाणून घेता येईल.
सीबीएसईने प्रसिद्धीपत्रकाद्वारे CTET परीक्षेची माहिती दिली असून ही परीक्षा ८ डिसेंबर २०१९ रोजी (रविवार) होणार असल्याचे सीबीएसईने म्हटले आहे.
 CTET परीक्षा ११० शहरात ही परीक्षा होणार असून ती २० भारतीय भाषेत घेतली जाणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत कोणत्याही केंद्र शासनाच्या केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, दिल्ली शिक्षा बोर्ड व महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळेत CTET/TET उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 परीक्षेसंबंधी अभ्यासक्रम, परीक्षा फी, परीक्षेचे ठिकाण हे जाणून घेण्यासाठी सीटीईटीच्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर १९ ऑगस्टपर्यंत माहिती मिळू शकणार आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ऑनलाइन अर्जाची फी जमा करण्यासाठी शेवटची तारीख  २३ सप्टेंबर पर्यंत आहे. 
सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना कमीत कमी ६० टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, दिव्यांग, उमेदवारांना यात ५ गुणांची सवलत देण्यात येणार आहे.
 CTET परीक्षेत पेपर एक व पेपर दोन हा प्रत्येकी 150 गुणांचा असतो.त्यात शालेय शिक्षणाशी निगडित 5 विषय प्रत्येकी 30 गुणांसाठी असतात.
CTET परीक्षेत 150 प्रश्न 150 गुणांसाठी असतात, तसेच परीक्षेसाठी नकारात्मक गुणदान पद्धती नाही.या परीक्षेचे स्वरूप पुढील माहितीवरून लक्षात येईल.
*#CTET पेपर एक अभ्यासक्रम, तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तके #*
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
          यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्रावर आधारित 6 ते 11 वर्षे वयोगट बालकांशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.
*संदर्भ पुस्तक*
१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते(चौथी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
२.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र - शिक्षणतज्ज्ञ डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन, पुणे
३.अरिहंत प्रकाशनचे बालविकास एवम शिक्षाशास्त्र हे हिंदी/इंग्रजी माध्यमात असणारे पुस्तक
*2.मराठी भाषा(30 गुण)*
       यामध्ये मराठी व्याकरणाच्या विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.तसेच मराठी कविता व उतारा यावर आधारित प्रश्न येतात.
*संदर्भ पुस्तक*
मराठी व्याकरण - के सागर/बाळासाहेब शिंदे/आशालता गुट्टे यापैकी कोणतेही पुस्तक
*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
          यामध्ये इंग्रजी व्याकरणाचे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात.तसेच कविता व उतारा यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात.
*संदर्भ पुस्तके*
१.इंग्रजी व्याकरण - के सागर किंवा रेन अँड मार्टिन किंवा बाळासाहेब शिंदे
       *4.गणित (30 गुण)*
        यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन,विभाज्यता,लसावी, मसावी, काळ-काम-वेग, शेकडेवारी, नफा-तोटा,सरासरी ,व्याज इत्यादी घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*संदर्भ पुस्तके*
१.पाचवी ते दहावीची NCERT व महाराष्ट्र स्टेट बोर्डाची गणित पाठ्यपुस्तके
२.नितीन महाले/शांताराम अहिरे/सतीश वसे यापैकी कोणतेही गणित पुस्तक
*5.परिसर अभ्यास (30 गुण)*
        यामध्ये विज्ञान, भूगोल व इतिहास यावर मूलभूत माहितीवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*संदर्भ पुस्तके*
१.पाचवी ते दहावी संबंधित विषयाची पाठ्यपुस्तके
२.विज्ञान विषयाचे अनिल कोलते यांचे पुस्तक
     *मागील सराव प्रश्नपत्रिका पेपर एक संदर्भ*
1.अरिहंत प्रकाशनचे CTET पेपर पहिला मागील प्रश्नपत्रिका हे हिंदी/इंग्रजी माध्यमात असणारे पुस्तक
2.TET पेपर पहिला सराव प्रश्नपत्रिका संग्रह(मागील सर्व प्रश्नपत्रिकांसह) - डॉ.शशिकांत अन्नदाते
       *#CTET पेपर दोन अभ्यासक्रम,तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक#*
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
          यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्रावर आधारित 11 ते 14 वर्षे वयोगट बालकांशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.पण पेपर एकपेक्षा पेपर दोन मधील प्रश्नांची काठिण्य पातळी वाढते.

Post a Comment

0 Comments

Close Menu