• केरळ राज्य सरकारने लंडन स्टॉक एक्सचेंज (LSE) याच्या व्यासपीठावर केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड (KIIFB) कडून विकले जाणारे मसाला कर्जरोखे सूचीबद्ध केले आणि हे रोखे विकणारे ते भारतातील पहिले राज्य ठरले.
• टाईम मॅगझीनने जगातील 100 प्रभावी व्यक्तींच्या यादी तThe Time 100 Most Influential People 2019 या नावाने १७ एप्रिल २०१९ रोजी प्रसिद्ध केली.या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि लोकचळवळींसाठी कायदेशीर लढा देणाऱ्या अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांचा सहभाग जगभरातील प्रभावी व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे.
• भारतीय चलनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच महात्मा गांधींच्या नव्या रुपातील 20 रुपयांची नोट दाखल करण्यात येणार आहे. नवीन वैशिष्ट्ये तसेच नव्या रंगातील ही नोट असणार आहे.
• सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या इंडीयन आॅईलला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीज आता सार्वाधिक महसूल कमावणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
• जपानचे सम्राट अकीहितो (वय ८५) यांनी ३० एप्रिल २०१९ रोजी स्वच्छने पदत्याग केल्याने युवराज नारुहितो यांना अधिकृतपणे नवा सम्राट करण्यात आले. (१२६ वे)
• तैवानच्या संसदेने समलैंगिक विवाहांना मान्यता दिली आहे. समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा तैवान आशियातला पहिला देश ठरला आहे.
• भारता सोबतच्या राजनयिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इंडोनेशियाने २३ एप्रिल २०१९ रोजी ‘रामायण’वर विशेष डाक तिकीट काढले आहे.
• श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कुमार संगकारा याची मेरिलिबॉन क्रिकेट क्लबचे (एमसीसी) पहिले गैर ब्रिटिश अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. या प्रतिष्ठित क्लबच्या 233 वर्षांच्या इतिहासात संगकारा 168 वा अध्यक्ष असणार आहेत.
• भारताच्या जी. एस. लक्ष्मी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सामनाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. लक्ष्मी या पहिल्या महिला आयसीसी मॅचरेफरी होणार आहेत.
• नामिबिया आणि ओमान यांच्यातील क्रिकेट सामना दरम्यान क्लेअर पोलोसाक हीने अंपायरिंग केलं. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अंपायरिंग करणाऱ्या क्लेअर पहिल्या महिला अंपायर ठरल्या आहेत.
• भारतात सुरू झालेल्या महिला मिनी आयपीएल स्पर्धेत काश्मीरमधल्या जासिया अख्तर ने स्थान मिळवलंय.
• सर्बियाचे ड्रगान मिहीलोव्हीच यांना भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय व्हॉलीबॉल महासंघ कडून नियुक्त करण्यात आले आहे.
• मुंबईची आरोही पंडित ही लाईट स्पोर्ट्स एअरक्राफ्टमधून एकट्यानं अटलांटिक महासागर पार करणारी जगातली पहिली महिला आणि सर्वांत तरुण पायलट ठरली आहे.
* विमेन एम्पावरमेंट एक्सपीडिशन अर्थात 'WE' (वुई) नावाच्या या मोहिमेअंतर्गत कॅप्टन आरोहीने हा पराक्रम गाजवला.
• भारताच्या जगजीत पावडीया यांची आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण मंडळावर (आयएनसीबी) फेरनिवड झाली.
• संयुक्त राष्ट्र संघाने अभिनेत्री दिया मिर्झाला संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सदभावना दूत (गुडविल अॅम्बेसिडर) म्हणून नियुक्त केले.
• कामी रीता शेर्पाने माऊंट एव्हरेस्ट २३ वेळा सर करत विश्वविक्रम केला असून, जगातील या सर्वात उंच शिखरावर पोहचण्याचा स्वत:चा विक्रम मोडला.
• सहजसुंदर अभिनयाने 'ऑस्कर' पुरस्कार सोहळ्यात छाप पाडलेल्या सनी पवार याने '१९व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०१९'मध्ये
('एनवायआयएफएफ')त्याच्या 'चिप्पा' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार जाहीर झाला.
('एनवायआयएफएफ')त्याच्या 'चिप्पा' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार जाहीर झाला.
• केरळ देशातील ४ आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेले भारतातील पहिले राज्य आहे. कोचीन, त्रिवेंद्रम, कालिकत आणि कन्नूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.
• पंजाब (फगवाडा ) येथे सुरु असलेल्या १०६ व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये देशातील पहिली चालकविना बस धावली
* राष्ट्रीय जैव इंधन धोरण (National Biofuel Policy) लागू करणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान
* केंद्र शासन ,राज्य शासन यांच्या सयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागीदारी परिषद मुंबई येथे आयोजित केली
आहे .२५ वर्षात मुंबईला आयोजक होण्याचा प्रथमच मान मिळाला.
* झारखंड या राज्यात भारतातील पहिला खादी मॉल स्थापन केला जात आहे.
* UNESCO कडून मान्यताप्राप्त वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फीअर रिझर्व्स (WNBR) मध्ये भारताच्या सिक्किम राज्यातल्या खंगचेंदझोंगा (किंवा कंचनजंगा) जैवविविधता संवर्धन प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. या यादीतले हे भारताचे 11वे स्थळ आहे.
* तमिळनाडु( तमिळनाडु कृषि विश्वविद्यालय, कोईमतूर) येथे भारतातील पहिले कीटक संग्रहालय या राज्यात स्थापन करण्यात येत आहे.
* औरंगाबाद जिल्ह्यात करोडी येथे राजस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे.
0 Comments