स्वप्न पाहणे


स्वप्न पाहणे हा तुमचा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. बिल गेट्सच्या बाबतीत त्याच्या शिक्षकांनी सांगितले होते की, हा मुलगा यशस्वी होणार नाही; परंतु याच बिल गेट्सने
संगणकामध्ये क्रांती घडवून आणून अब्जावधी रुपये कमावले. कर्नल सँडल्स हा उत्कृष्ट स्वयंपाकी होता. आपल्या 65व्या वाढदिवशी त्याने मित्रांसाठी कोंबडीचे जेवण केले. मित्राने खुश होऊन त्यास एखादे हॉटेल काढ असा सल्ला दिला. याच कर्नल सँडल्सने 299 ठिकाणी नकार पचवला. 300व्या ठिकाणी त्यास चिकन बनवण्याचे काम मिळाले. ते काम मिळताच अडीच वर्षात सँडल्सने 86 देशांत 13,000 हॉटेल्स  काढली. त्याची रोजची कमाई 27 लाख डॉलर्स आहे


तात्पर्य एकच - स्वप्न पाहणे हा तुमचा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वप्न वास्तवात आणणे हे तुमचे माझे कर्तव्य आहे

                 आपण कुणीही असाल, आपल्या प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण असेल तर जगरहाटीतून आपले कुठेच काही अडत नाही. इच्छा तिथे मार्ग असतो. या मार्गावर चालत राहणे मात्र मह्त्त्वाचे असते. म्हणूनच नकारात्मक भाव झटकत राहून आपल्या
व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. आपला पोषाख, दिसणे यापेक्षा आपल्याकडे कोणकोणती कौशल्ये आहेत, मराठी, हिंदी इंग्रजी भाषा कशी येते, व्यवहारज्ञान कितपत आहे, आपण निश्र्चित असे ध्येय निवडलेले आहे किंवा नाही इत्यादी गोष्टींना आजच्या युगात मोठे मह्त्त्व आहे. आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची सुरूवात ही आईच्या कुशीतून होते आणि जगाच्या व्यासपीठापर्यंत विकासाच्या नवनव्या संधी उपलब्ध होत असतात. त्या जितक्या समजून घेता येतील तेवढे आपण माणूस म्हणून समृद्ध होत असतो. तेव्हा आरशात दिसणाऱ्या माणसासाठी विकासाच्या नेमक्या वाटा शोधा. मरगळ झटका. आत्मविश्र्वासाने आपल्यात  अनुकूल असे बदल करण्याची सतत धडपड करा.
Swapnil Kankute

Post a Comment

Previous Post Next Post