तलाठी मार्गदर्शन


महत्वपुर्ण माहिती


जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी पात्रता,    वयोमर्यादा,  अभ्यासक्रम याची माहिती::
.
जिल्हा निवड समिती :

प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती असते. या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्हता प्राप्त उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात.
दर वर्षी या पदासाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.
.
शैक्षणिक अर्हता :
तलाठी पदासाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवाराने धारण करणे आवश्यक असते तसेच शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. संगणक/ माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत ती प्राप्त करणे आवश्यक राहील. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/ हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
.
वयोमर्यादा :
तलाठी पदाची जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 38 वर्षे अशी राहील.( याबाबत ऍड मध्ये अधिक माहिती स्पष्ट होईल )




पदभरतीचा कार्यक्रम :

 जिल्हा निवड समितीने जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून लेखी परीक्षा देण्यापर्यंतचा कालावधी 50 ते 60 दिवसांचा असतो. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होण्याची वाट न बघता विद्यार्थ्यांनी अगोदरपासूनच या परीक्षेची चांगली तयारी केल्यास लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीत प्रवेश करता येतो. तलाठी पदाकरिताही आता हजारो विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळे साहजिकच स्पर्धा वाढते. शासनाच्या निर्णयानुसार या पदासाठी आता मौखिक परीक्षा घेण्यात येणार नसून फक्त लेखी परीक्षेच्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तलाठी पदासाठी गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

परीक्षेचा दर्जा :
शासनाच्या तरतुदीनुसार ज्या पदाकरिता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे, अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील; परंतु, मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) दर्जाच्या समान राहील.

अभ्यासक्रम :
तलाठी पदाच्या परीक्षेला 1) मराठी,    2) इंग्रजी,   3) सामान्य ज्ञान व   4) बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण असून, एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
.
परीक्षेचे स्वरूप :
तलाठी पदासाठीची लेखी परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. त्यासाठी 100 प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे एकूण 200 गुण असतील. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असेल.

Post a Comment

1 Comments

  1. तलाठी परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके
    जर आपल्याला परीक्षा साठी उपयुक्त आणि दर्जेदार नोट्स पाहिजे असेल तर माला मेस्सेज करा – स्वप्नील कानकुटे( swapnilk.abd@gmail.com / www.facebook.com/swapnilkankute )

    ReplyDelete

Close Menu