सोच बदलो तो सितारे बदल जाते हैँ,
नजर बदलो तो नजारे बदल जाते हैँ,
कश्ती बदलने की जरुरत नहीँ,
कश्ती का रुख बदलो तो किनारे बदल जाते हैँ।"
1. अस्तित्वात
एक दिवस शिक्षकांनी (ज्यांना स्वताला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा) त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभे केले. प्रो. :
तर तुझा देवावर विश्वास आहे का? वि. : हो निश्चितच सर.. प्रो. :
देव हा चांगला आहे? वि. : हो सर प्रो. : देव हा सर्व शक्तिमान आहे? वि. :
हो सर अर्थातच .. प्रो. : माझा भाऊ कॅन्सरने वारला त्या आधी त्याने देवाची खुप प्रार्थना केली. आपल्यातला कोणी आजारी असतो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही? का देव चांगला नाही? (सर्व वर्ग शांत झाला). कोणीही याचे उत्तर देऊ शकत नाही. बरोबर? ठीक आहे मित्रा मी अजून काही विचारतो.' प्रोफेसर पुढे बोलू लागले. प्रो. : राक्षस चांगले आहेत? वि. :
नाही सर .. प्रो. :
कोणी बनवले यांना देवानेच ना.? वि. : हो सर...
प्रो. : दृष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत? वि. :
नाही सर .. प्रो. :
त्यांनाही देवानेच बनवले. हो ना? वि. : हो सर...
प्रो. : या जगातील आजारपण,अमानुषता, दु:ख, कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?' (विद्यार्थी शांत होता) प्रोफेसर पुन्हा म्हणाले. प्रो. :
विज्ञान सांगते तुम्हाला ५ ज्ञानेंद्रीय आहे ज्याने तुम्ही आजूबाजूचे जग समजून घेऊ शकता. सांग मित्रा तु कधी देवाला पाहीलेस? वि. : नाही सर ... प्रो. :
कधी देवाला ऐकलेस? स्पर्श केलास? कधी चव पाहीलीस? अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान आले आहे? वि. : नाही सर...
असे काहीही नाही. प्रो. :
मग निरीक्षणार्थ,परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की 'देव' ही संकल्पना अस्तित्वातच नाही. मग याला तु उत्तर काय देशील? वि. : मी म्हणेन माझी श्रद्धा आहे. प्रो. :
हो यस, श्रद्धा आणि ईथेच विज्ञानाचे घोडे अडते. माणुस विचार करणे सोडतो. आणि सगळे श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो. वि. :
माफ करा सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारु का? प्रो. : अवश्य ... वि. : सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? . प्रो. :
हो आहे ना. वि. :
आणि शीतलता? प्रो. : हो अर्थातच ... वि. :
नाही सर.. असे काहीच अस्तित्वात नाही.(वर्गात एकदम पिनड्रॉप शांतता झाली) सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शुन्य डीग्रीच्या ४५८ डीग्री खाली जातो आणि त्या तापमानाला No Heat तापमान म्हणतो. म्हणजेत उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता.' (वर्ग लक्षपुर्वक ऐकत होता) वि. : अंधाराबद्दल काय मत आहे सर आपले. ते अस्तित्वात आहे? प्रो. :
हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच ना? वि. :
तुम्ही पुन्हा चुकत आहात. आपले तर्कशास्त्र थोडेसे चुकीचे आहे . प्रो. : कसे काय सिद्ध करुन दाखव. वि. :
जर आपण सृष्टीच्या द्वैततत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात. विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारही कसे असतात हे विश्लेशीत करु शकत नाही. ज्या विचारांबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबेल पारीतोषिक देऊन सन्मान करते. जरा विचित्र नाही वाटत? .
विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करते त्याचा उगमस्त्रोत माहीत नसुनही हे वेडेपणाचे नाही वाटत ... मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही .. फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु. सर आपण ही गोष्ट मानता का की आपण माकडांचे वंशज आहोत .. प्रो. : हो मी मानतो ..उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा. वि. : मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वताच्या डोळ्यांनी पाहीली? नाही. मी ही नाही याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत .... (सर्व वर्गात हशा पिकला) सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो .. तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहीलाय ... कधी चव घेतलीय कधी स्पर्श केलाय? नाही ना? माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरे आहे हे आम्ही कसे समजून घेऊ? प्रो. : Well त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल .. (आता प्रोफेसर हासत होते. पहील्यांदा त्यांना तोडीस तोड कोणीतरी भेटले) वि. : एक्झॅक्टली .. सर .. देव आणि माणुस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा ...दुर्दैव..म्हणजे श्रद्धेचा आभाव दुसरे काही नाही....
(सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या) पुढे जेव्हा जेव्हा हा विद्यार्थी बोलला तेव्हा तेव्हा त्याने लाखो Minds Ignite केले. करोडो ध्येयवेड्या माणसांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी 'Wings of Fire' दिले .. हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती- डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम
0 Comments