यूपीएससीची तयारी


                यूपीएससीच्या लेखी चाचणीमध्ये या समस्येवर कुठल्या प्रकारचे प्रश्न भविष्यात विचारले जाऊ शकतात याचाही तर्क बांधावा लागतो. जमातवादाच्या स्वरूपासंबंधी थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा जमातवादाला चिकटून असलेल्या मुद्यांना धरूनही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. उदा. सामाजिक सद्भाव, सामाजिक ऐक्य, सामाजिक वीण, सामाजिक सहिष्णुता, सामाजिक ध्रुवीकरण या मुद्द्यांवर प्रश्न येण्याची शक्यता अधिक आहे, कारण हे सर्व मुद्दे वर्तमानातही उपस्थित आहेत. या उपघटकाची तयारी करताना अभ्यासाचा पट व्यापक ठेऊन या समस्येशी संबंधित असलेल्या वर्तमान मुद्यांना तो धरून असावा. कम्युनॅलिझम या संकल्पनेला मराठीतजमातवादअथवासांप्रदायिकताअसेही शब्दप्रयोग वापरले जातात. धर्मिक मूलतत्ववाद या अंगानेही जमातवादाचा अभ्यास केला जातो. जमातवादाचे संकल्पनात्मक स्पष्टीकरण करायचे झाल्यास, ज्यावेळी एखादा धार्मिक समुदाय दुसऱ्या धार्मिक समुदायाविरुद्ध धर्माच्या आधारावर संघर्ष करण्यास प्रवृत्त केला जातो तेव्हा जमातवादाचा जन्म होतो. सर्वसामान्यांची रुढीप्रियता, धर्मभोळेपणा याचा वापर करून एखाद्या समुदायाला दुसऱ्या धार्मिक समुदायाविरुद्ध उभे केले जाते, त्यातून धर्माचे राजकारण आकार घेते. थोडक्यात, जमातवाद म्हणजे दोन समुदायामध्ये धर्माच्या आधाराने संघर्ष निर्माण होणे. जमातवाद समुदायाच्या धार्मिक अस्मितेवर भर देतो. प्रत्येक धार्मिक समुदायाचे हितसंबंध विभिन्न असतात किंबहुना परस्पराविरोधी असतात. परिणामत: एका विशिष्ट धार्मिक समुदायाला आपल्या हितसंबंधाची जपणूक करायची म्हटले तर दुसऱ्या धार्मिक समुदायावर मात करण्याशिवाय पर्याय नसतो. थोडक्यात धार्मिक समुदायात संघर्ष अटळ ठरतो. ‘धर्मया घटिताच्या आधारे सामाजिक हितसंबंधाची जपणूक करता येते आणि त्यांच्या पूर्ततेसाठी जमातवाद धर्माच्या आधारे संघटन करण्याचा प्रयत्न करीत असतो. वसाहतिक शासनाच्या कूटनीतीतून आणि त्यांच्या इतिहासलेखनातून जन्माला आलेली सांप्रदायिकतेची समस्याही आधुनिक बनण्याच्या प्रक्रियेत असलेल्या भारतासमोरील एक मुख्य गतिरोधक बनून राहिली. गांधी काळापासून राष्ट्रीय स्वातंत्र्याबरोबर िहदू-मुस्लीम ऐक्याचा मुद्दा वारंवार ऐरणीवर आलेला दिसतो. फाळणीच्या अनुभवानंतर नेहरूंनी स्वतंत्र भारतात जमातवादाला शह देण्यासाठी विविधतेतच भारताची संस्कृती लपलेली असून सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेतूनच सामाजिक एकता निर्माण करणे सशक्त भारतासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. नंतरच्या काळात जमातवाद आणि राजकारण याची सरमिसळ होऊ लागल्याने या समस्येचे निराकरण करणे शासनाच्या आवाक्याबाहेरचे राहिले. हे लक्षात घेता जमातवादाचे राजकारण किंवा जमातवाद आणि राजकारण यांच्या आंतरसंबंधावर आगामी काळात प्रश्न येऊ शकतात

Post a Comment

0 Comments

Close Menu