एम पी एस सी म्हणजे काय ?

 www.mpscplanet.blogspot.in 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग
ब्रीदवाक्य
स्वसुखनीर भिलाष; विध्यते लोकहितो
मुख्यालय
मंत्रालय, मुंबई, भारत
बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ३रा माळा, एम.जी.रोड, हुतात्मा चौक, मुंबई - ४०० ००१
सेवांतर्गत प्रदेश
महाराष्ट्र
मालक
महाराष्ट्र शासन
संकेतस्थळ
अधिकृत संकेत स्थळ


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची माहिती

महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.
महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.

उदा. १) राज्य सेवा परीक्षा
२)
PSI/STI/ASST.
३)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा
५)महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
६)न्यायालयीन सेवा परीक्षा
७)सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
८)लिपिक -टंकलेखक परीक्षा

वेबसाईट :-
www.mpsc.gov.in
अर्ज करण्यासाठी वेबसाइट:-
www.mpsconline.gov.in



परीक्षेसाठी पात्रता:-
* शैक्षणिक - १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली अर्हता .
२) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
, गत-ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी
३) मराठीचे ज्ञान आवश्यक.

* वयोमर्यादा -
साधारण प्रवर्गासाठी किमान १९ वर्ष व कमाल ३३ वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत. 
कमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षे
अनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षम
खेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल.
अपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल.

* शारीरिक पात्रता -
) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त, गट-:- पुरूष उमेदवारांकरिता :- उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
 
महिला उमेदवारांकरिता

उंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)

) अधीक्षक,राज्य उत्पादनशुल्क , गट- , उप अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क , गट - :- 
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
 

महिला उमेदवारांकरिता
 
उंची- १५५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)

) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट- :-
पुरूष उमेदवारांकरिता :- उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
 
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .
 

महिला उमेदवारांकरिता
 
उंची- १६३ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .

Post a Comment

1 Comments

  1. सीमाभागातील 865 खेड्यातील उमेदवार अर्ज करू शकतात काय़?

    ReplyDelete

Close Menu