सुकन्या योजना - Gov. Yojana | Swapnil Sir



⚡ मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक विचार रुजविण्यासाठी व बालविवाहाचे प्रमाण रोखून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी 1 जानेवारी 2014 पासून राज्यात सुकन्या योजना सुरू करण्यात आली. महिला व बाल विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते.

🧐 योजनेच्या प्रमुख अटी :

▪ सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी
▪ मुलीला दहावी उत्तीर्ण करणे व 18 वर्षाच्या आत विवाह न करणे बंधनकारक असेल.
▪ एका कुटुंबातील दोनच मुलांना लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली अपवाद असतील
▪ अनाथ मुलींना दत्तक घेतल्यास लाभ मिळेल.
▪ लाभार्थी कुटुंबाला दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक असेल.

💰 लाभाचे स्वरूप असे : जन्मत:च प्रत्येक मुलीच्या नावे 1 वर्षाच्या आत 21,200/- रुपये आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत जमा करून मुलीने वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर तिला 1 लाख रुपये रक्कम दिली जाते.

Post a Comment

0 Comments

Close Menu