चालू घडामोडी : 3 जानेवारी

 3 जानेवारी 2021 चालू घडामोडी मराठी मध्ये "दैनिक करंट आणि अफेयर्सचे प्रश्न  उत्तरे मराठी मध्ये प्रकाशित केली जात आहेत.



एका ओळीत सारांश चालू घडामोडी 

  •  शिव राज्याभिषेक दिन 'स्वराज्यदिन' म्हणून साजरा होणार.
  • कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलीस कुटुंबियांना 50 लाख मदतीची घोषणा.
  • चेतन परदेशी यांचा सयुंक्त राष्ट्रा कडून 'सयुंक्त राष्ट्र स्वयंसेवक' पुरस्काराने सन्मानित केले.
  •  केंद्र सरकारने एक जानेवारीपासून कांद्याची निर्यात खुली करण्याचे आदेश जारी केले.
  • भारत आणि यूके यांच्यातली विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे.
  • महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला.
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंह यांचे दीर्घ आजाराने 2 जानेवारी ला निधन झाले.
  • 10 जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली स्पर्धेला सुरूवात होणार आहे.
  • नंदुरबारमधील शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शनिवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.२ व २.६ इतकी.
  • देशात फास्टॅग १ जानेवारी २०२१ पासून लागू करण्यात आला आहे.
  • स्लोवाकियाची महिला टेनिसपटू डगमारा बास्कोवावर मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी टेनिस इंटिग्रिटी युनिट (टीआययू)ने १२ वर्षाची बंदी घातली .
  • वोडाफोन-आयडिया १५ जानेवारी पासून दिल्लीतील ३ जी सर्विस बंद करणार आहे.
  • पन्नास वर्षाची परंपरा,जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील धारागीर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.


    पहिली स्वदेशी लस - मेड इन इंडिया कोरोना लस COVAXIN  ला परवानगी 

  • पहिली स्वदेशी लस जि च्या आपात्कालीन वापराला मंजुरी.
  • हैदराबादच्या भारत बायोटेकनं लस तयार केली. 
  • केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनंच्या तज्ज्ञांच्या समितीनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिला एमर्जन्सी युझसाठी परवानगी दिली.
  • भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजेच BBV152 ही लस.
  • लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते.
  • भारतात आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणारी ही दुसरी कोरोना लस आहे. 
  • 1 जानेवारी ला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लशीला ही परवानगी देण्यात आली. 

  • ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन का कंपनी यांच्या सह सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली ही लस आहे.

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंह
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंह यांचे दीर्घ आजाराने 2 जानेवारी ला निधन झाले, ते 86 वर्षाचे होते.
  • बुटा सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री आदी पदे भूषवितानाच बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपद ही सांभाळले होते.
  • 8 वेळा लोकसभेवर निवडून गेले, बुटासिंह हे माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते.
  • बुटा सिंग हे चार वेळा जलोरमधून खासदार राहिले आहेत.


  • एका ओळीत सारांश - सामान्य ज्ञान
    • 'हिमालयीन ग्रिफन' या गिधाडाचे वजन वजन ८ ते १२ किलो पर्यंत असतं त्यांच्या पंखांचा व्यास ९ ते १० फूट इतका असतो.२००० सालापर्यंत ९५ ते ९९ टक्के गिधाडे लुप्त झाली.
    • कोरोना काळात 98 पोलीस शहीद, 8 हजार कोरोनाबाधित झाले..
    • देशात १०५ वाघांचा मृत्यू; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
    • धारागीर हे जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध निवडणूक होणारे पहिले गाव ठरले आहे.
    • तिबेटची राजधानी ल्हासा.
    ___________________

    करंट अफेयर्स क्विझ या वेबसाइटवर दररोज मराठीत प्रकाशित केले जाते. आपल्याला दररोज करंट अफेयर्स क्विझ प्रश्न किंवा करंट अफेयर्स पीडीएफ डाउनलोड करायचे असल्यास दररोज या वेबसाइटला भेट द्या.


    यूपीएससी, पीएससी, आयएएस, आरआरबी, बँकिंग, दिवाणी न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, वन विभाग, आयबीपीएस, पीओ क्लर्क, एसबीआय, आरबीआय स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्नोत्तर.


    दररोज चालू घडामोडी प्रश्नोत्तरे, परदेशी व भारत सरकारची धोरणे, केंद्र व राज्य सरकारच्या योजना, क्रीडा उपक्रम, पुरस्कार, दिवसा गणिक ताजी अद्ययावत अद्ययावत माहिती पुरविणे हा या संकेत स्थळाचा उद्देश आहे. तर चला 3 जानेवारी 2021 रोजी चालू घडामोडीं बद्दल च्या सविस्तर माहिती जाणून घेऊया.


    Post a Comment

    0 Comments

    Close Menu