" मंत्र यशासाठी "

हॅलो फ्रेंड्स ...
यश मिळवण्यासाठी त्याग खूप महत्वाचा आहे. आता आजचा युगा बद्दल बोल्याचे म्हणले तर, आपल्या आस-पास  राहणारे लोक अशा घोष्टी सांगायला काही कमी नाही आणि त्यात सोशल मीडिया; काही दिवसा पूर्वी फेसबूक ग्रुप वर चर्चासाठी " त्याग " या विषयावर पोस्ट केली होती. अभ्यासात यश मिळवाचे असेल तर काय- काय त्याग करावे. पोस्टला प्रतिसाद सुरू झाला; सगळे आपले - आपले मत मांडू लागले त्यात जास्त प्रमाणात फेसबूक , व्हाटसप्प , इनस्टाग्राम ........... सध्या सुरू असलेले भलते सलते सोशल मीडिया. सर्वांना समजते की यश मिळवण्यासाठी या गोष्टीचा  त्याग करावा लागतो, तर करत का नाही. असू , मूळ मुद्यावर येतो .... !
            यशाच्या मंत्रा मध्ये काही मुद्दे कडले आहे , ते खलील प्रमाणे...
  1. कोणते ही काम करण्यापूर्वी ते स्वता:शी ठरवा. उदाहरण अर्थ- मला काहीतरी बनयाचे आहे.  माझी स्वत:ची ओळख निर्माण करायचे आहे. डॉक्टर, पोलीस, इंजिनीअर...... जे काही तुमचे  स्वप्न असेल ते स्वत:शी ठरवा; आणि हे सर्व स्वत:ला ठरवायचे आहे.
  2. मला नक्की काय सध्या करायचे, हे स्वत:शी ठरवा. उदाहरण अर्थ- काय साध्य करायचे हे जर माहिती असेल तर त्या प्रकारचा अभ्यास करणे सोपे जाईल. जसे,मुंबईला जायचे आहे या इतर कुठे ही; तर का ? कुठे ? कश्याला ? केव्हा ? किती वेळेने ? अश्या मुद्द्या वर विचार करता येईल . 
  3. तुमचे ध्याय होकारात्मक वाक्यात लिहा. जसे- आयुष्यात नेहमी स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा नाही तर .... , दूसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल !     
  4. मला हे ध्येयच का साध्य करायचे आहे , ते लिहा. कुणी सागत असेल म्हणून करत असाल तर होणार नाही.   
  5. हे ध्याय साध्य करण्यासाठी मला स्वत:त काय बदल करावे लागतील हे थोडक्यात लिहा. जसे किती अभ्यास करावे लागेल
  6. एका व्यक्तीचा आदर्श नेहमीच डोळ्यासमोर ठेवा . - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज ,ए.पी.जी.कलाम ..........   
  7. जगात नेहमी आपल्या पेक्षा अधिक परिणामकारक काम करणारे लोक असतात, हे ध्यानात ठेवा. 
  8. कृतीचा एक कच्चा आराखडा तयार करा व कामाला लागा. कृती अभावी स्वप्न हे स्वप्नच राहते, हे लक्ष्यात ठेवा. 
  9. तुमच्या कृतीमुळे तुम्ही तुमच्या ध्यायच्या जवळ जाऊ शकत नसाल तरी निराश होऊ नका. कृतीत बदल करा, त्यासाठी स्वत:च्या वागण्यात लवचिकता आणा एवडे केल्यावर तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसणारच दिसणार .!      

Post a Comment

0 Comments

Close Menu