*👨🏻🏫 स्पर्धा परीक्षा: ऐतिहासिक अभ्यासाची साधने*
*Swapnil Sir | इतिहास नोट्स*
▪ प्राचीन काळामध्ये मानवाने वापलेल्या वस्तु आजही सापडतात अशा अवशेषांना ऐतिहासिक अवशेष असे म्हटले जाते. यामध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनात वापरावच्या वस्तू, त्याचबरोबर भांडी, अलंकार, किल्ले, लेणी, स्तूप, नाणी, प्राचीन शिलालेख, चालीरिती, परंपरा, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांचा समावेश होतो.
▪ या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात. ज्याच्या सहाय्याने त्या काळातील लोकांचे राहणीमान व जीवनप्रणालीची माहिती मिळते.
▪ इतिहासाच्या साधनांचे एकूण भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे तीन प्रकार पडतात.
1⃣ भौतिक साधने - यामध्ये पुढील साधनांचा समावेश होतो.
▪ धातू व दगडाची हत्यारे व भांडी - मानवी जीवनाला सुरुवात झाल्यापासून मानवाने आपली जिवनप्रक्रिया पार पाडण्याकरिता विविध प्रकारची भांडी आणि साधने तयार केली. आदिमानवाच्या काळात दगडाची साधने वापरली गेली तर त्यानंतरच्या काळात भांडी व हत्यारे तयार करण्याकरिता तांब्याचा वापर केला गेला. आजही साधने अवशेषांच्या स्वरुपात सापडतात. ज्यांच्या सहाय्याने आपणास त्याकाळाच्या लोकांच्या राहणीमानाची कल्पना येते. यामध्ये प्रामुख्याने भांडी, हत्यारे, इत्यादि.
▪ पुरातन वास्तु - यामध्ये त्याकाळातील जनतेची घरे, मंदिरे, किल्ले, इमारती, नगररचना, यांचा समावेश होतो. ज्याव्दारे त्याकाळातील लोकाचे शिल्पकलेच्या रचनेची माहिती मिळते.
▪ पुरातन अवशेष - भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शहरेच्या शहरे जमिनीच्या आत गाडल्या गेली. अशा ठिकाणचे उत्खनन केल्यास, त्या ठिकाणी अवशेषाच्या स्वरुपात भांडी व भांड्याचे तुकडे, दागदागीने अन्नधान्याच्या बिया यांच्या माध्यमातून त्या काळातील इतिहासिक माहिती मिळते. याला पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात. ज्या शास्त्राव्दारे याचा अभ्यास केला जातो. त्यास पुरातत्व विद्या असे म्हणतात.
2⃣ लिखित साधने - लिखित साधनांमध्ये लेण्याच्या भिंतीवर लिहिलेले लेख, शिलालेख, ताम्रपत्र, भांडी व कच्या विटांवर केलेले लेखन, पपारस, झाडांच्या साली, भुर्जपत्रे लावर केलेल्या लेखणाचा समावेश होतो. ज्याव्दारे त्याकाळात घडलेल्या घटनांची माहिती मिळते.
3⃣ मौखिक साधने - यामध्ये पाठांतराच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या साहित्यांचा समावेश होतो. ज्यामध्ये कथा, भारुडे, ओव्या, लोकगीते इत्यादींच्या माध्यामातून त्या काळात घडलेल्या घटनेची माहिती मिळते.
🎲 *डेली करंट अफेयर्स अपडेट & एग्जाम हेल्प अभ आपके व्हाट्सअप्प पर , जॉइन करे ।* http://bit.ly/304cHy4
✨ _प्रमोटेड_
*स्वप्निल कनकुटे स्टडी अप्डेट्स,औरंगाबाद महाराष्ट्र*
📱 *Free Basic Updates*
Join Now http://bit.ly/Swapnil_Sir_Magazine
0 Comments