स्पर्धा परीक्षा: आदिमानवाचा जन्म

*👨🏻‍🏫 स्पर्धा परीक्षा: आदिमानवाचा जन्म*

*Swapnil Sir | स्पर्धा इतिहास नोट्स*

▪ सजीवाची उत्क्रांती होण्याच्या ओघात माकडासारखा प्राणी जन्माला आला. त्याला शेपूट नव्हते. त्याचे डोके माकडापेक्षाही मोठे होते. त्याचा पाठीत बाक होता आणि हा प्राणी दोन पायावर चालत असे. त्याचे हात गुडग्यापर्यंत लांब होते. त्याच्या भुवयावर जाड केस होते व संपूर्ण शरीरभर केस होते हा प्राणी म्हणजे आदिमानव होय.

▪ कालांतराने या प्राण्याच्या ठेवणीत बदल होवून आजचा आधुनिक मानव निर्माण झालेला आहे.

▪ मानवाचे वैशिष्टे : आजच्या आधुनिक मानवाचे खालील वैशिष्टे आहे.

▪ मानव हा सजीव सृष्टीमधील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे.

▪ इतर प्राण्यापेक्षा मानवाचा हाताचा सहज हलू शकतो त्यामुळे त्यास हाताच्या इतर बोटाच्या सहाय्याने कोणतीही वस्तु हातात पकडता येते.

▪ मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हत्तीसारख्या प्राण्यास नियंत्रणात आणले आहे आणि निसर्गातील सर्व साधनांचा उपयोग करण्याची क्षमता प्राप्त केली आहे.

▪ मानवाने भाषेचा विकास केला असून त्याव्दारे त्याने आपले अनुभव शब्दबद्ध करून येणार्‍या पिढीला ज्ञान म्हणून उपलब्ध करून दिले आहे. या घटनेमुळे मानवाचा विकास होत आहे.

🎲 *डेली करंट अफेयर्स अपडेट & एग्जाम हेल्प अभ आपके व्हाट्सअप्प पर , जॉइन करे ।* http://bit.ly/304cHy4

✨ _प्रमोटेड_
*स्वप्निल कनकुटे स्टडी अप्डेट्स,औरंगाबाद महाराष्ट्र*
📱 *Free Basic Updates*
Join Now  http://bit.ly/Swapnil_Sir_Magazine

Post a Comment

0 Comments

Close Menu