एमपीएससी :भाग १


 
       बुद्धीमत्ता चाचणी-उदाहरणांवर भर, चालू घडामोडीसाठी बाजारात अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. परंतु, विद्यार्थ्यांनी स्वत:चे नियमित वर्तमानपत्र वाचन ठेवावे. तसेच त्यातील नोंदी ठेवाव्यात. त्याचा निश्चित आणि चांगला फायदा होतो. मित्रांनो, आपली ही लेखमाला सर्व विभागातील पदांसाठी कमी-जास्त प्रमाणात होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी आहे. सध्या राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सदर परीक्षेसाठी तसेच मुख्यसाठी बाजारात अनेक उत्तम लेखकांची, प्रकाशकांची दर्जेदार पुस्तकं उपलब्ध आहेत.

                   महाराष्ट् राज्य शासनाची क्रमिक पुस्तके,लोकराज्य, योजना , भारतीय अर्थव्यवस्था , चालू घडामोडीसाठी बाजारात अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. परंतु, विद्यार्थ्यांनी स्वत: चे नियमित वर्तमानपत्र वाचन ठेवावे. तसेच त्यातील नोंदी ठेवाव्यात. त्याचा निश्चित आणि चांगला फायदा होतो.

 

       एम.पी.एस.सी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात. त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजे यशाची पहिली पायरी आहे आणि ती जर चढून पुढे जाता आल तर मात्र यश पण जर ह्या पायरी वरून चढता आल नाही तर मग अपयश पदरी पडते.

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम


          उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, नायब तहसीलदार, कक्ष अधिकारी व तत्सम पदांसाठी महाराष्ट्र्र लोकसेवा आयोग जी परीक्षा घेते त्याला राज्यसेवा परीक्षा असे म्हणतात.

ही परीक्षा खालील प्रकारे ३ टप्‍प्यांमध्ये घेण्यात येते.


. राज्य सेवा [पूर्व] परीक्षा               ४०० गुण

. राज्यसेवा [मुख्य] परीक्षा              ८०० गुण

. मुलाखत                           १०० गुण

परीक्षेसाठीची अर्हता


वयोमर्यादा

  साधारण प्रवर्गासाठी किमान १९ व कमाल ३३ वर्षे आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत. उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम

 [] महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ५ वर्षांपर्यंत.

 [] अपंग उमेदवारांच्या बाबतीत ४५ वर्षांपर्यंत.

 [] पात्र खेळाडूंच्या बाबतीत ५ वर्षांपर्यंत.

[] माजी सैनिक/ आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी यांचेसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्षांपर्यंत.

शैक्षणिक  

 [] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली समतूल्य अर्हता.

 [] सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब पदाकरिता भौतिकशास्‍त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी

[] मराठीचे ज्ञान आवश्यक.

1.राज्यसेवा [पूर्व] परीक्षा अभ्यासक्रम 


पेपर क्र.
 
गुण
 
कालावधी
 
दर्जा
 
माध्यम    
 
 
पेपरचे
स्वरूप
.
[अनिवार्य]
२००
२ तास 
पदवी
 
मराठी आणि इंग्रजी
 
वस्तुनिष्ठ
.
[अनिवार्य]
२००   
२ तास
घटक क्र.
मराठीआणि इंग्रजी  
वस्तुनिष्ठ

  

पेपर क्र.


. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्‍त्वाच्या प्रचलित घडामोडी.  

. भारताचा इतिहास [महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह] आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ.

. महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल

. महाराष्ट्र आणि भारत-राज्यव्यवस्‍था आणि शासन-राज्यघटना, राजकीय व्यवस्‍था, पंचायत राज, नागरी शासनव्यवस्‍था, सार्वजनिक धोरण, हक्क संदर्भातील मुद्दे इ.

. आर्थिक आणि सामाजिक विकास-शाश्वत विकास, दारिद्र्य, सर्वसमावेशकता, लोकसंख्या अभ्यास, सामाजिक सेवा धोरणे इत्यादी.

. पर्यावरणविषयक सामान्य मुद्दे परि‌स्थितिकी, जैववै‌विध्य आणि हवामान बदल [विषयाच्या विशेषीकृत अभ्यासाशिवाय]

. सामान्य विज्ञान

 

पेपर क्र. १ चा अभ्यास कसा कराल ?


वरील अभ्यासक्रमाला अनुसरून उमेदवाराने खालील पुस्तके घ्यावीत.

. ) भारताचा इतिहास

   ) आधुनिक भारताचा इतिहास

   ) इतिहास ८ वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके

. महाराष्ट्र्र, भारत आणि जगाचा भूगोल

   ) ६ वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके

   ) भूगोल

 

. भारतीय राज्यव्यवस्‍था

   ) ८ वी ते १० वी ची पाठ्यपुस्तके

   ) भारतीय राज्यघटना

   ) भारतीय राज्यघटना व पंचायतराज

. सामान्य विज्ञान

   ) ७ वी ते १० वी ची पाठ्यपुस्तके

   ) सामान्य विज्ञान

. आर्थिंक, सामाजिक विकास आणि पर्यावरण

   यासाठी उमेदवाराने पदवी स्तरावरील भारतीय अर्थव्यवस्‍था आणि भूगोलाची पुस्तके वाचावीत.

                              वरील अभ्यासक्रमत रूची निर्माण होण्यासाठी उमेदवाराने नियमित सह्याद्रीवरील बातम्या, दूरदर्शनवरील बातम्या आणि कोणतेही एका प्रादेशिक वृत्‍तपत्राचे संपादकीय वाचावे. पाठ्यपुस्तकाचे तीन चार वेळ वाचन झाल्यानंतरच उमेदवाराने अभ्यासक्रमानुसार तयार केलेली पुस्तके वाचावित. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नेहमी एक बाब लक्षात ठेवावी, ती म्हणजे सुरूवातीला प्रत्येक विषयाची बेसिक माहिती पक्की करण्याचा उमेदवाराने प्रयत्न करावा. एकदा बेस पक्का झाला की मग तुम्ही कोणताही संदर्भ ग्रंथ हाताळला तरी तो अभ्यासायला कठीण जात नाही. खूप चालू घडामोडींची पुस्तके वाचण्यापेक्षा उमेदवाराने डेली न्यूज, डेली वृत्‍तपत्र आणि रोजगार नोकरी संदर्भ यातूनच टिपणं काढण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व करीत असताना विचारलेल्या प्रश्नप‌त्रिकांचं उमेदवाराने आवर्जून वाचन करावं. विचारलेल्या प्रश्नपत्रांचं दोन तीन वेळा वाचन झालं की त्याच प्रश्नपत्रिका सरावासाठी वापराव्यात. जे प्रश्न दोन तीन वेळा वाचलेत त्याच प्रश्नांवर आपण जेव्हा सराव करतो तेव्हा प्रत्यक्षात आपल्याला किती गुण पडतात याची माहिती होते आणि अभ्यासाला प्रेरणा मिळते.

 पेपर क्र.


. उता-यावरील प्रश्न [आकलन]

. संवाद कौशल्यासह आंतरवैयक्तिक कौशल्ये.

. अनुमानात्मक चाचणी आणि विश्लेषणात्मक क्षमता.

. निर्णय प्रक्रिया आणि समस्या सोडवणूक

. सर्वसामान्य बुद्घीमत्ता चाचणी

. मूलभूत अंकगणित [संख्या, संख्यात्मक संबंध, घातांक इ.] – [दहावी] सामग्री विश्लेषण [तक्ते, आलेख, टेबल, सामग्रीचा पुरेसेपणा इ.] – [दहावीचा स्तर]

. मराठी आणि इंग्रजी भाषेतील उता-यावरील आकलनात्मक  कौशल्ये [दहावी/बारावी स्तर]

टीप १.  मराठी आणि इंग्रजी भाषेतील कौशल्य चाचणी करण्यासाठीचे प्रश्न अनुक्रमे मराठी आणि इंग्रजी भाषेतच असतील आणि त्यांचे भाषांतरित उतारे उपलब्‍ध नसतील.

टीप २.  1 ते 5 घटक पदवी स्तरीय असतील.

टीप 3.  प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील.

टीप 4.  राज्यसेवा [पूर्व] परीक्षेच्या दोन्ही पेपरची उपस्थिती मूल्यांकनाच्या हेतूच्या दृष्टीने अनिवार्य आहे. म्हणून उमेदवार दोन्ही पेपरला उपस्थित नसेल तर अपात्र ठरेल.

Post a Comment

0 Comments

Close Menu