एमपीएससी :भाग ३


पूर्व परीक्षेसाठी अभ्यास करताना पुढील गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात

                                  सर्वप्रथम पाचवी ते बारावीपर्यंतची राज्य पाठय पुस्तक मंडळाची पुस्तके व्यवस्थित वाचावीत. त्यातील प्रत्येक मुद्दा समजून घ्यावा. जर शक्य असेल तर कमीत कमी शब्दांत टिपण तयार करून ठेवावे. नवीन अभ्यासक्रमानुसार जी क्रमिक पुस्तके आहेत, ती पुस्तके राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, तसेच या पुस्तकांचा अभ्यास केल्याने कोणताही विषय सविस्तर समजणे जास्त सोपे होते, जे या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असते. जर विषय आपणास समजला असेल तरच प्रश्न सोडवणे शक्य होते. नाहीतर प्रश्नपत्रिका सोडविताना गोंधळ होण्याची शक्यता जास्त आहे. अभ्यासक्रमात दिलेले घटक एक-दोनदा वाचून, समजून घ्यावेत, म्हणजे अभ्यासाची दिशा चुकत नाही. पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा यांच्या अभ्यासक्रमातील सारखेच बिंदू काढून त्याचा सखोल अभ्यास करावा. म्हणजे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांचा अभ्यास एकाच वेळी करणे शक्य होते. पूर्वपरीक्षा संपल्यानंतर जर मुख्य परीक्षेतला कालावधी कमी असेल तर कमीत कमी वेळात आपण जास्त अभ्यास करू शकतो. बाजारात विविध प्रकारचे अभ्यास साहित्य उपलब्ध आहे, तसेच निरनिराळ्या खासगी शिकवणी वर्गाच्या नोट्सदेखील सहजतेने उपलब्ध होतात. मात्र अभ्यास साहित्य वाचताना जर दर्जेदार पुस्तकांचे वाचन केले तरच त्याचा फायदा होतो, नाहीतर विनाकारण दर्जाहीन निकृष्ट अभ्यास साहित्य वाचल्याने पदरी निराशा येऊन वाटयाला अपयश येते.

        चालू घडामोडी या घटकांचा अभ्यास करताना किती प्रश्न विचारले जातील, हे सांगणे कठीण असले तरी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांचा विचार केल्यास चालू घडामोडींचे ज्ञान असल्याखेरीज आपण पेपर चांगल्या गुणांनी पास होणे कठीण आहे. त्यासाठी रोज साधारणत: एक ते दोन वृत्तपत्रांचे नियमित वाचन करून त्याचे टिपण काढावे त्याचे वेळोवेळी वाचन करावे.

                    गेल्या काही वर्षांपासून आयोग प्रश्न विचारताना चार ते पाच कधी कधी त्यापेक्षा जास्त ओळींची माहिती देऊन त्यावर प्रश्न विचारते. असे प्रश्न सोडविताना जर आपण वृत्तपत्रांचे व्यवस्थित वाचन केलेले असेल तर आपण त्याचे उत्तर देऊ शकतो. परीक्षेच्या ऐनवेळी या घटकाचा अभ्यास करून योग्यप्रकारे तयारी होत नाही.

                          भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या भारताच्या भूगोलाच्या अभ्यासासोबत जगाचा भूगोलदेखील अभ्यासावा. भूगोलाचा अभ्यास करताना समोर नकाशा ठेवावा. वाचताना एखाद्या शहराचा उल्लेख आला असेल तर ते शहर नकाशात पाहून घ्यावे. गेल्या काही वर्षांपासून आयोग प्राकृतिक भूगोलावर बरेच प्रश्न विचारत आहे. म्हणून भूगोलाचा अभ्यास करताना पृथ्वीचे अंतरंग, खडकांचे प्रकार, निरनिराळी भूरूपे, वातावरण, वारे, आवर्त-प्रत्यावर्त तसेच स्थानिक वारे सागराचे अंतरंग, सागर जलाची क्षारता, सागराच्या क्षारतेवर परिणाम करणारे घटक, भरती-ओहोटी, मानवी वंश त्याचे वर्गीकरण, देशात महाराष्ट्रात तसेच जगात आढळणार्या विभिन्न जातीजमाती, लोकसंख्या लोकसंख्येचे वितरण . घटकांचा निश्चित अभ्यास करावा.

                                         राज्यसेवा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने पर्यावरण हा मुख्य घटक आहे. या संदर्भात वातावरण बदल, जैवविविधता, परिस्थितीकी, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता, वातावरण बदलासंदर्भात रिवो, कॅनकून परिषदांचा अभ्यास करावा. विज्ञानाचा अभ्यास करताना अवकाश तंत्रज्ञान, अणुऊर्जा, जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान यांचा अभ्यास करावा. तसेच मानवी आरोग्य विविध आजार यांचा अभ्यास करावा. पूर्वपरीक्षेला विज्ञानावर प्रश्न साधारणत: वैज्ञानिक घटकांवर त्यांचा मानवासाठी होत असलेला उपयोग या घटकाच्या अनुषंगाने विचारले जातात. त्यामुळे हा घटक अभ्यासताना सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची पुस्तके वाचून ती समजून नंतरच या घटकाची तयारी करावी.

                पूर्वपरीक्षेत

सामान्य अध्ययन 1 सामान्य अध्ययन 2 असे दोन पेपर असतात. सामान्य अध्ययन 1 बरोबर सामान्य अध्ययन 2 हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

 

सामान्य अध्ययन पेपर 2 ची तयारी : या प्रश्नपत्रिकेत 80 प्रश्न 200 गुणांसाठी दोन तासांत सोडवायचे असतात. विद्यार्थ्यांना पेपर 2 बाबत बर्याच अडचणी असता. प्रामुख्याने वेळेचे नियोजन जमत नाही. कोणत्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, याचा योग्य अंदाज बांधता येत नाही. पुढील परीक्षेसाठी तयारी करताना या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक घटकासाठी जेवढा सराव करता येईल तेवढा सराव करणे आवश्यक आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये पुढील घटकांचा अंतर्भाव असतो.

1) आकलन - या घटकांतर्गत काही उतारे दिले असतात त्यावर प्रश्न विचारले जातात. एमपीएससीच्या परीक्षेत आकलन या घटकांतर्गत उतारे हे मराठीत होते, ते मराठीत जरी असले तरी अगदी सोपे आहेत, त्यांचा सराव नाही केला तरी चालेल, या भ्रमात विद्यार्थ्यांनी राहू नये. याची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचण्याचा वेग वाढवणे आवश्यक आहे. दैनिक वृत्तपत्र किंवा मासिके वाचताना वेगात वाचून त्यांचे लवकरात लवकर आकलन कसे करता येईल याचा सराव विद्यार्थ्यांनी आतापासूनच करावा. आकलनासाठी काही उतारे सोडवण्याचा सराव करावा. जर मागच्या परीक्षेत विचारलेले उतारे पुन्हा सोडवून काढलेत तरी त्याचा खूप फायदा होईल. कधी कधी घरी बसून उतारे सोडविताना ते सोपे वाटतात, म्हणून आपण या घटकाच्या तयारीकडे विशेष लक्ष देत नाही. परंतु परीक्षा केंद्रात स्थितीही भिन्न असते. कारण त्या दोन तासांत आपल्या मनावर प्रचंड दडपण असते या दडपणाखाली सोपे उतार्यांवरचे प्रश्न चुकत असतात. हे सर्व टाळून जर यशस्वी व्हायचे असेल तर जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे.

 

2) निर्णयक्षमता समस्या निवारण - संघ लोकसेवा आयोगाच्या मागच्या दोन वर्षांच्या परीक्षा लक्षात घेता या घटकांसाठी निगेटिव्ह मार्किंगची पद्घत नव्हती, म्हणून या घटकांवरील प्रश्न विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम सोडवावेत.

3) सामान्य मानसिक क्षमता या घटकांचा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सराव करावा. सामान्यत: बुद्घिमत्ता घटकांतर्गत प्रश्न विचारले जातात तसेच प्रश्न या उपघटकांमध्ये विचारले जातात. या घटकांची तयारी विद्यार्थ्यांनी आतापासून करावी.

4) मूलभूत अंकगणित तक्ता आलेख - या घटकाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी भीती असते. कारण कोणत्या वेळी गणिताचा किती भाग समाविष्ट होईल हे सांगता येत नाही. याची तयारी करताना विद्यार्थ्यांनी काळ, काम आणि वेग, शेकडेवारी, सरासरी, जहाजाचा वेग .संबंधी उपघटकांचा व्यवस्थित सराव करावा.

5) इंग्रजी भाषेचे आकलन यात जे उतारे दिले जातात. ते फक्त इंग्रजी भाषेतूनच असतात. त्याचे मराठी भाषांतर नसते. परंतु या उपघटकांवरील उतारे हे तुलनेने सोपे असतात. जर इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याचा सराव केला तर हा घटक सोपा होतो.

एम.पी.एस.सी. पेपर : महाराष्ट्राचा भूगोल

एम.पी.एस.सी. यू.पी.एस.सी या दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने बघितल्यास भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. गेल्या दोन वर्षांतील यू.पी..सी.च्या सीसॅट परीक्षेचा अभ्यास केल्यास, असे लक्षात येते की, या घटकावर  साधारण २५ ते ३० प्रश्न विचारले जाता. एम.पी.एस.सी.च्या नवीन अभ्यासक्रमात (जो अभ्यासक्रम यूपीएससीसारखाच आहे.) काही बदल करण्यात आले आहेत. उदा. नवीन अभ्यासक्रमात जगाचा भूगोल हा नव्याने समाविष्ट केलेला घटक आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार जर कृषिशास्त्राचाही विचार केला तर या भागावर जवळजवळ ३५ ते ४० प्रश्न विचारले जात असत, आपण पीएसआय /एसटीआय / असिस्टंट या परीक्षांचाही विचार केला तर या घटकावर साधारणत: २५ ते ४० प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

                 राज्यसेवेचा अभ्यास असो वा यू.पी.एस.सी.चा अभ्यास, एक महत्त्वाचे सूत्र आहे, ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. फक्त पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे यश मिळवणे असे नाही तर आपल्याला पूर्व, मुख्य मुलाखत या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होणे आवश्यक आहे. म्हणून पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नेहमी डोळ्यासमोर ठेवावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्याचा फायदा असा आहे की, यामुळे अभ्यास जास्त सविस्तर आणि परिपूर्ण होण्यास मदत होते. शिवाय मुख्य परीक्षेला अभ्यासाचे कमी दडपण असते. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश आहे

 महाराष्ट्राचा, भारताचा जगाचा- प्राकृतिक, सामाजिक íथक-भूगोल. जर आपण यू.पी.एस.सी.चा अभ्यासक्रम बघितला तर त्यात भारताचा जगाचा प्राकृतिक, सामाजिक íथक भूगोल आहे. त्यात फक्त महाराष्ट्राचा भूगोल नाही.

महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना पुढील घटकांचा अभ्यास करावा

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल ज्यात महाराष्ट्रातील डोंगररांगा, त्या डोंगररांगेतील महत्त्वाची शिखरे त्या डोंगररांगा कोणत्या जिल्ह्य़ात पसरलेल्या आहेत, . चा अभ्यास करावा. नदीप्रणाली अभ्यासताना त्या नद्यांवरील विविध प्रकल्प, महाराष्ट्राची पीकप्रणाली. महाराष्ट्राची मृदा, महाराष्ट्राचे हवामान, खनिज संपत्ती, वाहतूक व्यवस्था, विविध शहरे पर्यटन केंद्र यांचा सविस्तर अभ्यास करावा.

          हा अभ्यास करतानाच महाराष्ट्राचा जिल्हावार अभ्यास करावा. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात काय महत्त्वाच्या घडामोडी झाल्यात यांचा अभ्यास केल्यास चालू घडामोडींचा देखील अभ्यास होतो. शक्यतो महाराष्ट्राचे कोरे नकाशे घेऊन त्यावर जिल्हावार नोट्स तयार केल्यास अधिक उत्तम. कारण परीक्षेच्या काळात कमी वेळेत या विषयाची उजळणी पूर्ण होते.

                   महाराष्ट्राच्या सामाजिक भूगोलाचा अभ्यास करताना २००१ २०१6 च्या जनगणनेचा सविस्तर अभ्यास करावा. महाराष्ट्राची लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, तिचे वितरण, िलग गुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मुत्युदर यांचा अभ्यास स्वतंत्र तक्ता बनवून तुलनात्मक दृष्टीने करावा. महाराष्ट्राची लोकसंख्या, लोकसंख्येचा चढता-उतरता क्रम, घनतेचा चढता-उतरता क्रम स्वतंत्र वहीत लिहून त्याचे वारंवार वाचन करावे. महाराष्ट्रातील वस्तीप्रणाली ग्रामीण नागरी वस्त्या, त्यांच्या समस्या यांचा अभ्यास करावा. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जिल्हावार अभ्यास करताना महाराष्ट्रातील विविध जाती-जमाती लक्षात ठेवाव्यात. महाराष्ट्राचा íथक भूगोल अभ्यासताना महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, त्यांचे वर्गीकरण, ऊर्जासाठे, त्यांचे उत्पादन, जिल्हावार वर्गीकरण, त्यांचे विविध प्रकल्प, आयात-निर्यात यांची माहिती, त्यांचा क्रम यांचा अभ्यास नकाशाच्या मदतीने करावा.

                   वरीलप्रमाणे अभ्यास केल्यास आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर मधील  पुढील विषयांचा अभ्यास होण्यास मदत होते.

) महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

) íथक भूगोल

) महाराष्ट्राचा मानवी सामाजिक भूगोल

) लोकसंख्या भूगोल

 

भारताचा भूगोल जर आपण राज्यसेवा यु.पी.एस.सी.चा अभ्यास करीत असाल तर हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. भारताचा प्राकृतिक विभाग अभ्यासताना हिमालय, हिमालयाच्या डोंगररांगा त्यांची विभागणी, हिमालय पर्वतातील महत्त्वाच्या िखडी, हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या, त्यावरील निरनिराळे प्रकल्प, मदानी प्रदेश, त्यांचे वितरण, भारताचा पठारी प्रदेश, पठारावरील निरनिराळ्या डोंगररांगा, पूर्वघाट, पश्चिम घाट, अंदमान, निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे यांचा अभ्यास करावा. भारताच्या हवामानाचा अभ्यास करताना भारतीय मान्सून, त्याचा उदय, पावसाचे वितरण, भारतीय हवामानावर एल् निनो ला-निना यांचा प्रभाव, अवर्षण पूर यांचा अभ्यास करावा.

भारतीय सामाजिक íथक भूगोलाचा अभ्यासात २००१ २०१6 च्या जणगणनेचा तुलनात्मक अभ्यास, भारतीय लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, स्त्री-पुरुष प्रमाण, बाल मृत्युदर, माता मृत्युदर या मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा. त्याच प्रमाणे भारतातील नागरीकरण, नागरीकरणाच्या समस्या, झोपडपट्टींचा प्रश्न, केंद्र सरकार-राज्य सरकार यांनी या समस्या सोडविण्यासाठी योजलेले उपाययोजना यांचा अभ्यास करावा. भारतात íथक भूगोल अभ्यासताना खनिज संपत्ती, उद्योगधंदे, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, वाहतूक व्यवस्था यांचा अभ्यास करावा. अभ्यास करताना नकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा.

जगाचा भूगोल राज्यसेवा पूर्वपरीक्षेत हा अभ्यासक्रम नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना सर्वप्रथम नकाशावरील महत्त्वाचे भाग मार्क करून त्याचा अभ्यास करावा. उदा. निरनिराळ्या देशातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, महत्त्वाची सरोवरे . नंतर जगाचा अभ्यास. खंडाप्रमाणे केल्यास जास्त सोपा होतो. उदा. अमेरिकेचा अभ्यास करताना दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका यांतील पर्वतश्रेणी, नदीप्रणाली, विविध सरोवरे, त्यांचा दक्षिण उत्तर क्रम, खनिज संपत्ती, निरनिराळे प्रकल्प, महत्त्वाची शहरे असा अभ्यास करावा.

                             यूपीएससीच्या मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेतल्यास महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे या घटकावर साधारणत: प्रश्न नकाशावर विचारले जातात. म्हणून एक चांगला नकाशा घेऊन त्याचा अभ्यास केल्यास अवघड प्रश्नांची उत्तरे देणे सोपे होते. याशिवाय जगातील शेतीप्रणाली, उद्योगधंदे, जंगल, मासेमारी, खनिज संपत्ती यांचे तक्ते बनवावेत.

भूगोलाचा अभ्यास करताना फक्त भूगोलाचाच अभ्यास होत नाही तर सामान्य अध्ययनातील चालू घडामोडींचाही अभ्यास होत असतो.म्हणून या घटकाचा अभ्यास करताना पुढील पुस्तकेचा आधार घ्यावा.

महाराष्ट्र बोर्डाची सहावी ते दहावीपर्यंत भूगोलाची पुस्तके

यूपीएसीसाठी पाचवी ते दहावीपर्यंतची सी.बी.एस.सी. बोर्डाची पुस्तके तसेच

इंडिया इयर बुक जे अद्याप बाजारपेठेत आहे. (भारत सरकारचे) ते मात्र यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नक्की वाचावे, त्याचप्रमाणे एम.पी.एस.सी. मुख्य परीक्षेसाठी हे पुस्तक वाचणे आवश्यकच आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारा अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे:


 

*    सर्वात प्रथम कोणत्याही इतर बाबीकडे लक्ष न देता आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे.वेळ कमी आहे. आपण अभ्यासाला १००% कसे देता येईल यावर जास्त भर असायला हवा.

*    कृपया किती जागा आणि कोणत्या सेवा जोडल्या जाणार आहेत ते विचारु नका.stydy ला जास्त वेळ द्यावा.

*    CSAT, पेपर बाबत आपणास खूपच भीती असते.ते साहजिक पण आहे.परंतु कोणतेही गोष्ट सरावाशिवाय शक्य नाही आणि त्या सरावाला सातात्य पण असायला हवे.त्यामुळे CSAT ला येथुन पुढे परीक्षेपर्यत दररोज वेळ द्यायला हवा.असा परीक्षा जवळ आली कि मी CSAT ला १५ दिवस देईल हे घातक ठरेल.म्हणुन त्याचा दररोज अभ्यास करा

*    आपल्यातील काही उमेदवार प्रथमच या परीक्षेला सामोरे जात असतील तर त्यांनी कसलीही भीती न बाळगता सामोरे जायला हवे.कोणाशीही तुलना न करता स्वतः ला सख्शम बनवायला हवे.स्वतः मधील कच्चे दुवे शोधून त्यावर काम करायला हवे.जसे कि कोणाला गणित अवघड जाईल तर कोणाला अर्थशास्त्र.यावार जास्त भर द्यायला हवा.

*    जे उमेदवार मागच्या परीक्षेत पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही त्यानी मनात कोणतेही नकारत्माक विचार बाळगता ,आपण ही परीक्षा पास होणार ही खुनगाठ मनाशी पक्की करा.आपण मागच्या परीक्षेत कुठे मागे पडलो यावर मंथन करा.जर तुमचे प्रयत्न १००%नसतील तर अपयश पदरी पङते म्हणून आपले प्रयत्न हे योग्य दिशेने,परिपूर्ण,सकारत्मक,आत्मविश्वासपूर्वक असयाला हवेत.म्हणजे मागचे अपयश विसरून नव्याने सुरवात करायला हवी.स्वतः वर विश्वास ठेवा.( वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही.... तो थांबतो,वेळ जाऊ देतो,अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..... घेऊन, तीच दहशत.....अन तोच दरारा!!!पराभवाने माणुस संपत नाही.,प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..कठीण काळात सतत स्वतःला सांगा,की "शर्यत अजुन संपली नाही, कारण, मी अजुन जिंकलेलो नाही.)

*    परीक्षा जवळ आले कि अफवाना उत येतो त्याकडे दुर्लक्ष करा.जशा कि परीक्षा पुढे जाणार, जागा वाढणार नाहीत इत्यादी.

*    पूर्व परीक्षा ही मुख्यतः तुमच्या पायाभूत अभ्यासाची चाचणी वर आधारित असल्यामुळे तुमचे basic चांगले असायला हवे.त्यासाठी शालेय पुस्तके आणि NCERT books चे वाचन करायला हवे.या परीक्षेत कोणतेही प्रश्न विचारले जातात तरी जर जास्तीतजास्त अभ्यास आणि त्याची उजळणी पण व्हायला हवी.

*    ही परीक्षा objective प्रकारची असल्याने जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याकडे कल असयला हवा.त्यासाठी अयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका,विविध प्रश्नसंच मधून सराव करा.

*    सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, स्पर्धा परीक्षा या तुमची गुणवत्तेची कसोटी असते.ही पुस्तके वाचण्याची स्पर्धा नाही.त्यामुळे जे पण तुम्ही वाचा एकाग्रतने आत्मसात करा.जे पण विषय घ्याल त्यासाठी एक refrance, पुस्तक घ्या.

*    वर्षे स्वतःला झोकून द्या.आणि कसलाही timpass करता पूर्ण अभ्यासावार लक्ष द्या यश तुमच्या हातत असेल.

*    खुप मोठा अभ्यासक्रमाचा बोझ घेऊ नका.अभ्यास हा entertainment समजून enjoy करा.

*    अवघड अथवा नावडते विषय fresh mind असताना घ्या,आणि त्याच्याकडे आपल्याला नविन काही तरी शिकायला मिळेल या भावनेने पहा.म्हणजे ते विषयावर पण तुमची पकड येईल.

*    short मध्ये नोट्स काढण्याची सवय लावा.नोट्स काढल्याने अभ्यास करताना एकाग्रता वाढते आणि revision ला उपयोगी पडते.

*    अभ्यासाचे नियोजन केलेले कधीही चांगले.ते नियोजन daily,weekly, आणि monthly अधारावर असावे.

*    परीक्षेपुर्वी साधरणपणे १५ दिवस अगोदर अभ्यासक्रम पूर्ण असायाला हवे म्हणजे नंतर revision करता येईल.

Post a Comment

0 Comments

Close Menu