अभ्यास कसा कराल
?
खरे पाहता पेपर २ मध्येच या
विषयातच पूर्व परीक्षा उत्तीर्ण करता येईल एवढी क्षमता आहे. सायन्सच्या
तथा बॅंक,
निवड मंडळांच्या परीक्षेची कसून तयारी करणा-या उमेदवारांना हा विषय सोपा
जातो. फार कमी
अभ्यासात खूप अधिक गुण मिळवून देणारा हा पेपर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या
विषयाकडे दुर्लक्ष करू नये. यातील अर्धेअधिक प्रश्न हे
उत्ता-याशी संबंधितच
असतात. अनेकांचा असा
गैरसमज असतो की उतारा वाचला की लगेच उत्तरे देता येतात. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, जो विषय सोपा
असतो त्याच विषयात अधिकाधिक गुण मिळविण्याची रणनीती तुम्ही आखली पाहिजे. म्हणून उता-यावरील प्रश्न
सोडविण्याचा चांगला सराव करा. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही बॅंक
किंवा एमपीएससी पूर्व व मुख्य परीक्षांचे प्रश्न सोडून पाहण्याचा सराव करावा, अर्थातच त्या
प्रश्नांचे स्वरूप दिलेल्या अभ्यासक्रमानुसार असावे.
या पेपरच्या विचारलेल्या प्रश्नपत्रिका
प्रत्येकाकडे असायलाच हव्यात. त्यानुसारच तुम्ही बॅंक व तत्सम
परीक्षांत विचारलेल्या प्रश्नांवर सराव करावा.
या पेपरमध्ये १०
टक्क्यांपर्यंत गुण सहजासहजी मिळविता येतात. त्यासाठी आपण सुरूवातीला योग्य
अभ्यास साहित्याची जुळवाजुळव आणि भरपूर सराव करणे गरजेचे आहे.
2. राज्यसेवा [मुख्य] परीक्षाः स्वरूप
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा – २०१२ साठीच्या
सुधारित अभ्यासक्रमामध्ये सहा अनिवार्य विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
विषय
|
गुण
|
स्वरूप
|
परीक्षेसाठीचा
वेळ
|
मराठी
|
१००
|
पारंपरिक
|
३ तास
|
इंग्रजी
|
१००
|
पारंपरिक
|
३ तास
|
सामान्य
अध्ययन -
१ १५० वस्तुनिष्ठ
बहुपर्यायी २ तास
सामान्य
अध्ययन -
२ १५०
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी २ तास
सामान्य
अध्ययन -
३ १५०
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी २ तास
सामान्य
अध्ययन -
४ १५०
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी २ तास
|
|
एकूण
|
८००
|
सामान्य अध्ययनसाठीच्या सर्व
म्हणजे चारही पेपर्सचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे असून ह्यासाठी [३: १] ह्या प्रमाणात नकारात्मक
गुणपद्धती स्वीकारण्यात आली आहे. मुख्य परीक्षेच्या सर्वच्
म्हणजे सहाही पेपरमध्ये स्वतंत्रपणे पास होणे अनिवार्य आहे. सर्वसाधारण
प्रवर्गासाठी पास होण्याची पात्रता ४५ टक्के इतकी आहे तर आरक्षित प्रवर्गासाठी
पात्रता ४० टक्के इतकी आहे.
पेपर – 1
|
पेपर –
2
|
||||
मराठी(अनिवार्य)
|
१०० गुण
|
वेळ:३ तास
|
इंग्रजी(अनिवार्य)
|
१०० गुण
|
वेळ:३तास
|
१. लेखन घटक
२. आकलन
३. व्याकरण
|
1. Essay
2. Letter Writing
3. Communication Skills
4. Precis Writing
5. Compreshension
6. Paraphrase of Prose Passage
7. Grammar
|
||||
सामान्य अध्ययन
१ गुण – १५० वेळ २ तास
[अ] इतिहास
१. आधुनिक भारताचा [१८१८-१८५७] महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह अभ्यास
२. भारतामधील ब्रिटिश सत्तेची स्थापना.
३. सामाजिक – सांस्कृतिक बदल
४. सामाजिक – आर्थिक जागृती
५. भारतीय राष्ट्रवादाचा उगम आणि विकास
६. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ
७. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारत
८. महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक [त्यांची विचारसरणी आणि कार्य]
९. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा [प्राचीन ते आधुनिक]
[ब] भूगोलः
महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह
१. प्राकृतिक भूगोल
२. महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल
३. महाराष्ट्राचा मानवी आणि सामाजिक भूगोल
४. पर्यावरण भूगोल
५. लोकसंख्या भूगोल [महाराष्ट्र्राच्या विशेष संदर्भासह]
६.
सुदूर संवेदन
[क]
भूगोल आणि कृषी
१.
कृषी परिस्थितिकी
२.
हवामान
३.
मृदा
४.
जल व्यवस्थापन
सामान्य अध्ययन
२ गुण – १५० वेळ २ तास
भारतीय
राज्यघटना आणि भारतीय राजकारण [महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह] आणि कायदे
१.
भारताची राज्यघटना
२.
राजकीय व्यवस्था [शासनाची रचना, अधिकार आणि
कार्ये]
३.
राज्यशासन आणि प्रशासन [महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह]
४.
जिल्हा प्रशासन
५.
ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
६.
शिक्षण व्यवस्था
७.
पक्ष आणि दबाव गट
८.
प्रसारमाध्यमे
९.
निवडणूक प्रक्रिया
१०.
प्रशासकीय कायदे
११.
केंद्र आणि राज्य शासनाचे विशेषाधिकार
१२.
काही महत्त्वाचे कायदे
१३.
समाजकल्याण आणि सामाजिक कायदे
१४.
सार्वजनिक सेवा
१५.
सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण
सामान्य अध्ययन
३ गुण – १५०
वेळ २ तास
मानवी
साधनसंपत्तीचा विकास आणि मानवी हक्क
[अ]
मानवी
साधनसंपत्तीचा विकास
१. भारतातील मानवी साधन संपत्तीचा
विकास
२.
शिक्षण
३.
व्यावसायिक शिक्षण
४.
आरोग्य
५.
ग्रामीण विकास
[ब]
मानवी हक्क
१.
मानवी हक्कांची वैश्विक सनद
२.
बाल विकास
३.
महिला विकास
४.
युवक विकास
५.
आदिवासी विकास
६.
सामाजिकदृष्ट्या मागासवर्गाचा विकास
७.
वृद्घ कल्याण
८.
कामगार कल्याण
९.
विकलांग व्यक्तींचे कल्याण
१०.
पुनर्वसन
११.
आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना
१२.
ग्राहक संरक्षण
१३.
मूल्ये आणि नैतिकता
सामान्य अध्ययन
४ गुण – १५०
वेळ २ तास
[अ]
अर्थव्यवस्था
आणि नियोजन
१.
भारतीय अर्थव्यवस्था
२.
ग्रामीण आणि नागरी पायाभूत संरचना विभाग
३.
उद्योग
४.
सहकार
५.
आर्थिक – सुधारणा
६.
आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल संचार
७.
दारिद्र्य मोजणी आणि अंदाज
८.
रोजगार निर्मिती निश्चित करणारे घटक
९.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
[ब]
विकासाचे
अर्थशास्त्र आणि कृषी
१.
समग्रलक्षी अर्थशास्त्र
२.
सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
३.
वृद्घी, विकास आणि आंतरराष्ट्रीय
अर्थशास्त्र
४.
भारतीय कृषी, ग्रामीण विकास आणि सहकार
५.
कृषी
६.
अन्न आणि पोषण
७.
भारतीय उद्योग पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र
[क]
विज्ञान आणि
तंत्रज्ञानाचा विकास
१.
ऊर्जा
२.
संगणक आणि माहिती – तंत्रज्ञान
३.
अवकाश – तंत्रज्ञान
४.
जैव तंत्रज्ञान
५.
भारताचे आण्विक धोरण
६.
आपत्ती व्यवस्थापन
3. स्टेप 3 – मुलाखत
मुलाखतीच्या सखोल मार्गदर्शनासाठी उमेदवाराने........... लिखित ‘मुलाखतीचे
तंत्र आणि मंत्र’ हे पुस्तक
वाचावे.
एम.पी.एस.सी. ची तयारी करताना आत्तापासूनच विद्यार्थ्यांने इंग्रजी व मराठी लेखनाची सवय करावी. पूर्वपरीक्षा संपल्यानंतर जर मुख्य परीक्षेत कालावधी कमी असेल तर एवढया कमी कालावधीत या दोन प्रश्नपत्रिकांची तयारी पूर्ण होत नाही, म्हणून आतापासून वेगाने लिहिण्याची तसेच अक्षर सुवाच्च काढून कमीत कमी वेळेत कमीत कमी शब्दांत आपले विचार प्रभावीपणे कसे मांडू शकतो, याचा सराव करावा. काही विद्यार्थ्यांचा असा समज असतो की, या दोन प्रश्नपत्रिकांची विशेष तयारी न करता आपण मुख्य परीक्षेला सहज हे पेपर लिहू शकतो. मात्र हा फाजील आत्मविश्वास ठरू शकतो.सामान्य अध्ययनाच्या पेपरचा अभ्यास करताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. ती म्हणजे पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययनाच्या पेपर-1 चा अभ्यास करताना मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययनाच्या दृष्टीने अभ्यास केल्यास त्याचा लाभ राज्यसेवा पूर्व परीक्षेला तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेला व केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला नक्कीच होतो. पूर्व परीक्षेला व मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययानाचा पेपर हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो. अभ्यासक्रमातदेखील फारसा फरक नाही. उदा. पूर्व परीक्षेसाठी इतिहास अभ्यासताना भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास पूर्व व मुख्य परीक्षेत सारखाच आहे. त्यामुळे पूर्वपरीक्षेत या घटकाचा अभ्यास करताना वाचन सूक्ष्म रीतीने करावे, म्हणजे त्याचा लाभ मुख्य परीक्षेला होतो. गेल्या दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, पूर्व परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात, त्यांचा दर्जा उच्च असतो. त्यामुळे उथळ अभ्यास करून उत्तीर्ण होणे कठीण आहे. भारतीय राज्यघटनेचा पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा पेपर 2 याचा अभ्यासक्रम पाहून तयारी केल्यास मुख्य परीक्षेचा बराचसा अभ्यास हा पूर्व परीक्षेत होऊन जाईल. राज्यसेवा चा पेपर 2 अभ्यासल्यास महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की, फक्त पुस्तक वाचून किंवा गाईड वाचून अथवा पाठांतर करून ही परीक्षा उत्तीर्ण होणे आता कठीण आहे. यासाठी विषय नेमका समजून त्यावर सखोल चिंतन करावे. दोन-तीन विद्यार्थ्यांचा गट तयार करून महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा करावी. अभ्यासक्रमातील मुद्यांची चालू घडामोडीं बरोबर सांगड घालून अभ्यास करावा. गटचच्रेमधून एखादा अवघड विषय सोपा होतो व प्रत्येक मुद्याचा अभ्यास करणे शक्य होते
पूर्वपरीक्षा जर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये असल्यास इंडिया इअर बुक हे बाजारात उपलब्ध होईल ते एकदा व्यवस्थित अभ्यासावे. त्याचा फायदा मुख्य परीक्षेच्या पेपर 3 व 4 साठी सर्वात जास्त होतो, किंबहुना मुख्य परीक्षेचा अभ्यास इंडिया इअर बुकच्या अभ्यासाशिवाय पूर्ण होत नाही. राज्यसेवेची तयारी करणारे खूप सारे विद्यार्थी `इंडिया इअर बुक`चा अभ्यास करत नाहीत. त्याचा फटका पूर्व- मुख्य परीक्षेला होतो.
अर्थशास्त्राचा अभ्यास करताना अर्थशास्त्राच्या संकल्पना व्यवस्थित समजून अर्थसंकल्प, भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अभ्यासावी पेपर 4 मधील अर्थशास्त्रावरील खूप सारे प्रश्न महाराष्ट्राची आर्थिक पाहणी व भारताची आर्थिक पाहणी याच्याशी संबंधित असतात.
0 Comments